शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कांगारुंचे शेपूट वाकडेच, मॅक्सवेलकडून कोहलीच्या दुखापतीची खिल्ली

By admin | Updated: March 19, 2017 08:30 IST

अष्टपैलू फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी यजमान संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीची खिल्ली उडवली.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. 19 : भारत आणि आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान मैदानावरील वाद आजही कायम होते. अष्टपैलू फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी यजमान संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीची खिल्ली उडवली.

गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्या सामन्यात खेळण्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. खांद्याला हाताचा आधार देत तो मैदानातून परतला होता. स्कॅननंतर स्नायू ताणल्या गेले असल्याचे स्पष्ट झाले. त्याने ४०० मिनिटे क्षेत्ररक्षण केले नाही. त्यात दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा समावेश आहे.

भारतीय कर्णधार आज मात्र फलंदाजीला आला. तो केवळ सहा धावा काढून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. शुक्रवारी शानदार शतकी खेळी करणारा मॅक्सवेल आज कोहलीच्या दुखापतीची खिल्ली उडवत असल्याचे निदर्शनास आले. त्याने भारतीय कर्णधाराच्या दुखापतीची नक्कल केली आणि ८१ व्या षटकात चौकार रोखल्यानंतर उठताना उजव्या खांद्याला हाताचा आधार दिला. पुजाराने कमिन्सच्या गोलंदाजीवर फ्लिकचा फटका मारला. चेंडू सीमारेषेकडे जात असताना मॅक्सवेलने सूर मारत चेंडू थोपवला आणि उठताना कोहलीच्या दुखापतीची खिल्ली उडवली. कोहली मैदानाच्या त्याच भागात दुखापतग्रस्त झाला होता.

यापूर्वी, बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान डीआरएसच्या मुद्यावर वाद झाला होता. आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ डीआरएस रिव्'ू घेण्यासाठी ड्रेसिंग रुमचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले होते. त्यावर कोहलीने कडवी प्रतिक्रिया नोंदवली होती.  सामन्यानंतर कोहलीने स्मिथला ‘लबाड’असल्याचे म्हटले नसले तरी पाहुण्या संघाचा कर्णधार रिव्'ूसाठी ड्रेसिंग रुमचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करीत होता, असा आरोप केला होता. दरम्यान, स्मिथने कोहलीचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते.