शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - लोकांच्या अपेक्षांची कल्पना आहे, मागचे रेकॉर्ड महत्वाचे नाहीत - विराट कोहली

By admin | Updated: June 17, 2017 18:44 IST

देशावासियांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे ओझे कसे हाताळायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 17 - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या पाकिस्तान विरुद्ध होणा-या फायनलसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून, देशावासियांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे ओझे कसे हाताळायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे असे कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काहीवर्षांपासून मी या परिस्थितीतून जातोय. जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा या गोष्टी तुमच्या डोक्यात नसतात असे कोहलीने सांगितले. 
 
लोकांना आमच्याकडून अपेक्षा असणार. आम्ही प्रत्येकवेळी चांगली कामगिरी करावी अशी लोकांची अपेक्षा असते. पण प्रत्येकवेळी हे शक्य नाही हे खेळाडू म्हणून मला समजते. मैदानावर काही गोष्टी घडतात काही घडत नाहीत हे समजून घेतले पाहिजे. मैदानावर जी कामगिरी करायचीय त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे विराट म्हणाला. 
 
लोकांच्या अपेक्षांचा कसा सामना करायचा त्यावर तुम्ही मार्ग शोधला पाहिजे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. तुम्हाला त्यात संतुलन राखता आले पाहिजे असे कोहली म्हणाला. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले असले तरी, मागची कामगिरी जास्त महत्वाची ठरत नाही असे विराट म्हणाला. 
 
काही संघ आत्मविश्वासाने सुरुवात करतात. काही संघ जोरदार पुनरागमन करतात. पाकिस्तानने अशीच जोरदाप पुनरागमनाची कामगिरी केली आहे असे विराट म्हणाला. त्यांचा दिवस असेल तर ते कोणालाही पराभूत करु शकतात. पण आमचा आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. 
 
दोन्ही संघांना चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे, उद्या सर्व खेळाडूंचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. ठराविक एक विचार डोक्यात ठेऊन आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळतोय, आम्ही तशाच प्रकारचे क्रिकेट अंतिम सामन्यातही खेळू  असे विराट म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या हॉकी सामन्यासाठी विराट कोहलीने भारतीय हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा.