शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विजयी कर्णधाराची उचलबांगडी हा चुकीचा पायंडा!

By admin | Updated: January 13, 2017 01:24 IST

भारतीय डेव्हिस चषक टेनिस संघाच्या कर्णधार पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले आनंद

नवी दिल्ली : भारतीय डेव्हिस चषक टेनिस संघाच्या कर्णधार पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले आनंद अमृतराज हे १९८७-८८ पासून तीन दशके सर्वोत्कृष्ट कर्णधार राहिले. त्यांच्यापेक्षा सरस कर्णधार मी तरी पाहिलेला नाही, असे मत व्यक्त करीत दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांनी विजयी कर्णधाराची उचलबांगडी हा चुकीचा पायंडा असल्याची टीका केली आहे. आनंद हे विजय यांचे लहान बंधू आहेत.डेव्हिस चषकात स्वत: भारताचे कर्णधार राहिलेले विजय म्हणाले, ‘आनंद समर्पित व्यक्ती होते. त्यांनी देशाला जे निकाल दिले त्यावर कुणी शंका घेऊ शकत नाही.’ दोनदा विम्बल्डन आणि दोनदा अमेरिकन ओपनची उपांत्यपूर्व फेरीत धडक देणारे विजय म्हणाले, ‘मी प्रत्येक विषयात ढवळाढवळ करीत नाही. पण १९८७-८८ पासून आनंदपेक्षा सरस कुणी कर्णधार झाला नाही, इतके सांगू शकतो. तो माझा भाऊ आहे म्हणून नव्हे तर त्याचे कर्तृत्व पाहून हे वक्तव्य करीत आहे. अन्य खेळाडू त्यांच्या क्षमतेचा नाही. २० वर्षे अव्वल स्तरावर डेव्हिस चषक खेळला. काही दिग्गजांना पराभूत केले. टेनिसप्रति तो झपाटला असून फ्युचर्स, चॅलेंजर्स आणि एटीपीसारख्या २५० स्पर्धांवर तो ध्यान देत आहे.’ (वृत्तसंस्था)

खराब कामगिरीमुळे नव्हे तर संघात शिस्त कायम राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून आनंदला एआयटीएने निलंबित केले, याकडे लक्ष वेधले असता विजय अमृतराज पुढे म्हणाले, ‘मला अन्य मुद्दे माहिती नाहीत. मी वृत्तपत्रात वाचले. माझ्या मते, आनंद सर्वोत्कृष्ट कर्णधार होता.’आनंद हा पुण्यात होणाऱ्या भारत-न्यूझीलंड लढतीत देशाचे अखेरचे नेतृत्व करणार आहे. एप्रिलपासून संघाची धुरा महेश भूपतीकडे जाणार आहे. महेश भूपती हा नेतृत्व करण्याइतपत पात्र आहे यात शंका नाही. पण आनंदने पहिल्या १०० जणांमध्ये खेळाडूंचा समावेश नसतानादेखील निकाल दिले आहेत. विजयी कर्णधाराला सहसा अशाप्रकारे काढण्याची परंपरा योग्य नाही. सद्यस्थितीत प्ले आॅफमध्ये स्थान मिळविणे सोपे नाही. निकाल चांगले येत नसतील तर बदल केला, हे मी समजू शकतो. पण निकाल चांगले येत असताना असा तुघलकी बदल आश्चर्यचकित करणारा आहे. -विजय अमृतराज