शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजवर 105 धावांनी दणदणीत विजय, भारताची मालिकेत 1-0 आघाडी

By admin | Updated: June 26, 2017 10:01 IST

अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (१०३) व शिखर धवन (६३), कर्णधार विराट कोहली (८७) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
पोर्ट ऑफ स्पेन, दि. 26 - अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (103) व शिखर धवन (63), कर्णधार विराट कोहली (87) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. यासोबतच 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
या सामन्यात फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने निर्धारीत 43 षटकात वेस्ट इंडिजविरुध्द 5 बाद 310 धावांचा डोंगर उभारला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 43 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 205 धावा बनवू शकला. भारताकडून चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदिप यादवने सर्वाधिक 3, भुवनेश्वर कुमारने 2 आणि आर.अश्विनने एक गडी बाद केला. तर वेस्ट  इंडिजकडून होपने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली.   
पावसामुळे उशीराने सुरु झालेला हा सामना प्रत्येकी 43 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोर्ट ऑफ स्पेन येथे यजमानांनी नाणेफेक जिंकत पाहुण्या टीम इंडियाला अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर रहाणे - धवन यांनी चौफेर फटकाबाजीस सुरुवात केली. त्यांनी खराब चेंडूंना सीमापार धाडतानाच काही चांगल्या चेंडूंना योग्य तो सन्मानही दिला. कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता दोन्ही सलामीवीरांनी भारताला अर्धशतकी सलामी दिली. सलग दुसऱ्या सामन्यात रहाणे - धवन यांनी शतकी भागीदारी करताना भारताला 114 धावांची सलामी दिली. अ‍ॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर धवन यष्टीचीत झाला. त्याने 59 चेंडूत 10 चौकारांसह 63 धावा केल्या.
यानंतर रहाणे - कोहली यांनी सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना 97 धावांची भागीदारी करुन यजमानांना दमवले. रहाणे शतक झळकावल्यानंतर लगेच बाद झाला. त्याने 104 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारांसह 103 धावा केल्या. यावेळी, सर्वांच्या नजरा मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यावर होता. परंतु, तो केवळ 4 धावांवर परतल्यानंतर युवराज सिंगही झटपट बाद झाला. त्यामुळे भारताच्या धावसंख्येला ब्रेक लागला.
मात्र, एका बाजूने टिकून राहिलेल्या कोहलीने मोक्याच्यावेळी गती वाढवताना भारताला तिनशेच्या पलीकडे नेण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने 66 चेंडूत 4 चौकार व 4 षटकार ठोकत 87 धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये एमएस धोनी (13*) व केदार जाधव (13*) यांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारताने मोठी धावसंख्या रचली.