शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

वर्मा बंधूंची उपांत्य फेरीत धडक

By admin | Updated: November 5, 2016 05:29 IST

भारताच्या समीर आणि सौरभ या वर्मा बंधूंनी धमाकेदार खेळ करताना बिट्सबर्गर ओपन ग्राप्री गोल्ड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली

सारब्रुकेन (जर्मनी) : भारताच्या समीर आणि सौरभ या वर्मा बंधूंनी धमाकेदार खेळ करताना बिट्सबर्गर ओपन ग्राप्री गोल्ड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या उपांत्यपुर्व सामन्यात समीरने यूक्रेनच्या आर्टेम पोचतारोवला २-० असे सहज लोळवून दिमाखात आगेकूच केली. तर, त्याचा मोठा भाऊ सौरभने झुंजार खेळाचे प्रदर्शन करुन उपांत्य फेरी निश्चित केली. एकूणच स्पर्धेत वर्मा बंधूंनी चांगलीच चमक दाखवताना सर्वांचे लक्ष वेधले आहे.१२व्या मानांकीत समीरने पोचतारोवला केवळ ३५ मिनिटांमध्ये पराभूत केले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना त्याने पोचतारोवचा २१-१४, २१-१६ असा धुव्वा उडवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या समीरने पहिल्यांदाच पोचतारोवचा सामना केला.अ पोचतारोव जागातिक क्रमवारीत ६८व्या स्थानी आहे. पहिल्या गेममध्ये धडाकेबाज सुरुवात करताना समीरने सलग ७ गुणांची कमाई करताना ९-४ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मजबूत आघाडी घेताना त्याने पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये समीरला काहीप्रमाणात कडवी झुंज मिळाली. १७-१६ अशा नाममात्र आघाडीवर असताना समीरने सलग चार गुणांची वसूली करत दुसरा गेम २१-१६ असा जिंकून उपांत्य फेरी निश्चित केली. दुसरीकडे, नुकताच चीनी तैपई ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या सौरभने आपला धडाका कायम राखताना जर्मनीच्या मार्क ज्वैबलरला तीन गेमच्या अटीतटीच्या लढतीत २१-१५, १६-२१, २१-१५ असे नमवले. ५१ मिनिटांमध्ये रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना सौरभने पुरुष एकेरीत भारतीयांचे दुहेरी आव्हान कायम राखले. पहिला गेम सहजपणे जिंकून आघाडी घेतलेल्या सौरभला दुसऱ्या गेममध्ये ज्वैबलरकडून कडवी झुंज मिळाली. यावेळी ज्वैबलरने हा गेम जिंकत सामना बरोबरीत आणला. यानंतर निर्णायक तिसऱ्या गेममध्ये मात्र सावध व संयमी खेळ करताना मोक्याच्यावेळी आक्रमक फटके मारत सौरभने ज्वैबलरला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.त्याचवेळी, मिश्र युगुलमध्ये मात्र भारताच्या पदरी निराशा आली. प्राजक्ता सावंत आणि योगेंद्रन कृष्णन यांना कियान मेंग टान - पेई जिंग लाई या चौथ्या मानांकीत मलेशियन जोडीविरुध्द १५-२१, ११-२१ असे पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)