शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीकी बंधूंचा अफलातून खेळ; भारत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 00:57 IST

युवराज व देवेंद्र वाल्मीकी बंधूंच्या अफलातून खेळाच्या जोरावर वर्ल्ड हॉकी लीग उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पोलंड संघाचा ३-० गोलने पराभव करीत आपले विजयी

एंटनर्प (बेल्जियम) : युवराज व देवेंद्र वाल्मीकी बंधूंच्या अफलातून खेळाच्या जोरावर वर्ल्ड हॉकी लीग उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पोलंड संघाचा ३-० गोलने पराभव करीत आपले विजयी अभियान सुरू ठेवले. भारताच्या या विजयात युवराजने २३, कर्णधार सरदारसिंगने ४१ आणि देवेंद्रने ५२ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करीत, संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलत आपल्या संघाचा दुसरा विजय साजरा केला. १६ डिग्री सेल्सियस तापमान आणि थंड हवामानात पोलंड संघाला प्रतिकूल परिस्थिती त्यांनी पहिल्या क्वाटरमध्ये चांगला खेळ केला. त्यांनी आपल्या आघाडीच्या फळीत जास्त खेळाडू ठेवून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रमणदीप सिंगला लढतीच्या सुरुवातीला गोल करण्याची संधी मिळाली होती, पण. त्याचा त्याला फायदा घेतला आला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पोलंडच्या आघाडीच्या फळीने २० व्या मिनिटाला भारताची बचाव फळी भेदण्याचा प्रयन्त केला. त्यात त्यांना पेनेल्टी कॉर्नर मिळाला. त्यांचा कर्णधार पॉवेल ब्रॅटकोवस्कीच्या ड्रॅग फ्लिकवर भारताचा गोलरक्षक श्रीजेशने उत्कृष्ट बचाव केला. २३ व्या मिनिटाला भारताच्या युवराजने मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा घेत पोलंडच्या गोरक्षकाच्या डोक्यावरुन चेंडू गोलमध्ये टाकला. त्यानंतर भारताचा कर्णधार सरदारसिंगने ४१ व्या मिनिटाला डीच्या तेथून गोलच्या दिशेने जोरदार फटका मारून आपल्या संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर लगेचच देवेंद्रने आपल्या पदार्पणाच्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात संघाचा दुसरा गोल केला. त्याने चिंगलेनसना सिंगने दिलेल्या पासला रिफ्लेक्ट करुन गोल करीत आपल्या संघाची गोल संख्या ३-० केली. ही भारताची आघाडी शेवट पर्यंत राहिली. भारताची पुढील लढत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तांनविरुद्ध २६ जून रोजी होईल. (वृत्तसंस्था)