शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

युएस ओपन

By admin | Updated: September 7, 2014 00:03 IST

सेरेनासमोर वोज्नियाकीचे आव्हान

सेरेनासमोर वोज्नियाकीचे आव्हान
यूएस ओपन टेनिस : मकारोव्हा, शुआईला घरचा रस्ता
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स, डेन्मार्कची अनुभवी खेळाडू कॅरोलिन वोज्नियाकी यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून फायनलमध्ये प्रवेश केला़
अव्वल मानांकित सेरेना हिने उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर १७ वे मानांकनप्राप्त रशियाच्या एकातेरिना मकारोव्हा हिच्यावर सरळ सेटमध्ये ६-१, ६-३ अशा फरकाने मात करीत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला़
दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात वोज्नियाकी हिने आपले विजयी अभियान कायम राखताना चीनच्या पेंग शुआई हिचे आव्हान ७-६, ४-३ असे मोडून काढताना स्पर्धेच्या फायनलमध्ये मजल मारली़ विशेष म्हणजे या लढतीत शुआईला दुखापत झाली होती़ तरीही तिने वोज्नियाकीचा सामना केला; मात्र तिला या लढतीत विजय मिळविता आला नाही़
रविवारी होणार्‍या फायनलमध्ये १७ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाचा सामना वोज्नियाकीशी होणार आहे़ स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सेरेना हिने उपांत्य फेरीत मकारोव्हा हिच्यावर अवघ्या ६० मिनिटांत सरशी साधली़ या लढतीत सेरेना हिने ५ एस आणि २४ विनर्स लगावले़
स्पर्धेच्या चौथ्या फेरीत रशियाची अनुभवी टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिला धूळ चारणार्‍या वोज्नियाकी हिला २००९ मध्ये अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये किम क्लाईस्टर्सकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते़ त्यानंतर पहिल्यांदाच ती एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे़
दुसरीकडे सेरेना विल्यम्स हिने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे़ फायनलमध्येही विजयी अभियान कायम राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने म्हटले आहे़ विशेष म्हणजे या वर्षी एकाही ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाला चौथ्या फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता़ (वृत्तसंस्था)