शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अविस्मरणीय विजय

By admin | Updated: February 23, 2015 01:18 IST

ऐतिहासिक मेलबोर्न मैदान भव्यदिव्य आहे, पण रविवारी चर्चा होती ती येथे उपस्थित प्रेक्षकांच्या गर्दीची. एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले हे

ऐतिहासिक मेलबोर्न मैदान भव्यदिव्य आहे, पण रविवारी चर्चा होती ती येथे उपस्थित प्रेक्षकांच्या गर्दीची. एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले हे स्टेडियम भारत-दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीच्यावेळी ‘हाऊसफुल्ल’ होते. मैदानावर उपस्थित प्रेक्षकांच्या जल्लोषाचे वर्णन करणे कठीण आहे. मैदानावर उपस्थित भारतीय चाहत्यांबाबत काय सांगणार? शिखर धवन ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवित होता त्यावेळी ही लढत मेलबोर्नमध्ये नसून भारतातील एखाद्या मैदानावर होत असल्याचा अनुभव येत होता. जगप्रसिद्ध मेक्सिकन वेव्हचाही येथे अनुभव आला. प्रेक्षकांच्या गर्दीला सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत पण एमसीजी व्यवस्थापनाने हे अग्निदिव्य सहज पार पाडले. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासून ते एस्केलेटरपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना देण्यात आलेल्या सुविधा अव्वल दर्जाच्या होत्या. भारताचा डाव आटोपल्यानंतर महान लेगस्पिनर अनिल कुंबळेचा आयसीसी हॉल आॅफ फेममध्ये समावेश करण्याचा सोहळा पार पडला. स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण होता. यजमान आॅस्ट्रेलियाचा या लढतीत समावेश नव्हता, तरी अनेक आॅस्ट्रेलियन चाहते लढतीचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते.