शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवी धोनीचे न ऐकणे विराटला पडले महागात..!

By admin | Updated: January 23, 2017 11:40 IST

गोलंदाज बुमराहचा चेंडू मॉर्गनच्या पॅडला चाटून गेला आणि सर्वांनी पंचांकडे बादचे अपील केले. धोनी नाही म्हणत असतानाही कोहलीने रीव्ह्यूची मागणी केली आणि तो तोंडघशी पडला.

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 23 - तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव करत इंग्लंड संघाने मालिकेत शेवटचा सामना जिंकला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 321 धावा केल्या पण भारताला ५० षटकांत ३१६ धावाच करता आल्याने हा सामना गमवावा लागला. केदार जाधवच्या ९० धावांच्या खेळीमुळे हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा ठरला. 
विशेष म्हणजे नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीकडून या सामन्यात एक चूक झाली आणि नेटीझन्सनी त्याला चांगलेच धारेवर धरले. 
झालं असं की, गोलंदाज बुमराह टाकत असलेल्या 29 व्या षटकातील एक चेंडू इंग्लंडच्या मॉर्गनच्या पॅडला चाटून गेला आणि बुमराहसह मैदानावरील सर्वच भारतीय खेळाडूंनी पंचाकडे बादचे अपील केले. मात्र पंच कुमार धर्मसेनानी यांनी मॉर्गनला नाबाद ठरवले. त्यानंतर कर्णधार कोहलीने धोनीकडे पाहिले आणि पंचाच्या या निर्णयावर लगेच रीव्ह्यूची मागणी केली. अनुभवी धोनीने त्याला तसे करण्यापासून रोखले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रिव्ह्यूनंतर तिसऱ्या पंचानीदेखील मुख्य पंचाचा निर्णय कायम ठेवत मॉर्गनला नाबाद घोषित केले. यामुळे कोहलीला धक्का बसला आणि धोनीचे न ऐकल्याबद्दल नेटीझन्सनीही कोहलीचा चांगलाच समाचार घेतला. 
(VIDEO : विराट कर्णधार असल्याचे विसरला धोनी)
  •  
 
कॅप्टन कूल अशी ख्याती असलेल्या धोनीने नुकताच वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि विराट कोहली कॅप्टनशीप सोपवण्यात आली. असे असले तरी कधीकधी धोनीला आपण कॅप्टन नसल्याचा विसर पडतो आणि तो कोहलीच्या आधीच एखादा निर्णय घेतो.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यातही हे दिसून आले होते. पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने विराट कोहलीच्या आधीच रिव्ह्यूचे अपील केले होते, पण विशेष म्हणजे कोहलीनेही खिलाडू वृत्ती दर्शवत आपल्या सीनियरच्या निर्णयाचा मान राखत पाठोपाठ अपील केले होते. 
मात्र कालच्या सामन्यात कोहलीने धोनीचे न ऐकता रिव्ह्यू घेतला आणि तो तोंडघशी पडला. अतिशय धमाकेदार खेळाडू असलेला कोहली वन-डे कॅप्टनशीपमध्ये अद्याप नवखा असल्याचे आणि धोनी अजूनही 'बाप' असल्याचेच कालच्या सामन्यात सिद्ध झाले. धोनीने आत्तापर्यंत घेतलेले रिव्ह्यूचे 90 टक्के निर्णय अचूक ठरले आहेत.