लास वेगास : कमालीच्या लोकप्रिय वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेटच्या (डब्लूडब्लूई) धर्तीवरील व्यावसायिक रेसलिंग स्पर्धा भारतातदेखील रुजविण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाले आहेत. अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी)मधील रेसलर सीएम पंक याने असे सूतोवाच केले आहे. पूर्वीचे डब्ल्यूडब्ल्यूएफ व आत्ताचे डब्ल्यूडब्ल्यूईचे सामने देशात लोकप्रिय आहेत. त्याचा फायदा उठविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. पंक याने डब्ल्यूडब्ल्यूईतून संन्यास घेतला असून, ते आता यूएफसीचा एक भाग आहेत. ही स्पर्धा सध्या अमेरिकेत खूप लोकप्रिय झाली आहे. भारताचा आघाडीचा मुष्टियोद्धा विजेंदरसिंग याचेदेखील व्यावसायिक स्पर्धेत सहभागासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. पंक याचा भारतातदेखील मोठा चाहता वर्ग आहे. (वृत्तसंस्था)
भारतातही यूएफसीचा थरार
By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST