शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन अर्धशतकांमुळे आत्मविश्वास उंचावला

By admin | Updated: September 3, 2015 22:49 IST

श्रीलंका दौऱ्यात मोक्याच्या क्षणी सलग दोन अर्धशतके ठोकल्यानंतर आत्मविश्वासात भर पडली. याचा लाभ द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निश्चितपणे होईल

नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यात मोक्याच्या क्षणी सलग दोन अर्धशतके ठोकल्यानंतर आत्मविश्वासात भर पडली. याचा लाभ द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निश्चितपणे होईल, असा विश्वास यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने व्यक्त केला आहे.रिद्धिमान जखमी झाल्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत नमन ओझाने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. रिद्धमान आता बरा झाला असून, आफ्रिकेविरुद्ध संघात स्थान मिळण्याची त्याला अपेक्षा आहे. तो म्हणाला, की आफ्रिकेविरुद्ध मालिकेस दोन महिन्यांचा अवधी आहे. त्याआधी बंगालकडून रणजी सामने खेळेन. फिजियोचा सल्ला घेताच खेळायला सुरुवात करणार आहे. गालेतील पी सारा स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांत रिद्धिमानने ६० आणि ५६ धावा ठोकल्या. या धावा त्याने विपरीत परिस्थितीत ठोकल्या हे विशेष.सिलिगुडी येथे वास्तव्य करणारा ३० वर्षांचा रिद्धिमान सात कसोटी सामने खेळला, त्यात त्याच्या २८४ धावा आहेत. आतापर्यंतच्या प्रवासात माझ्यामते रेयॉन हॅरिस हा मला सर्वांत चांगला गोलंदाज वाटल्याचे त्याने सांगितले. यष्टिरक्षणातील स्वत:च्या भूमिकेबद्दल आनंदी असलेला हा खेळाडू पुढे म्हणाला,‘‘लंकेत यष्टिरक्षण करताना मजा आली. चौथ्या आणि पाचव्या दिवशी तेथील खेळपट्ट्यांवर जो वेग पाहायला मिळाला त्यामुळे मी भारावून गेलो.’’अखेरच्या कसोटीत नमन ओझा खेळल्याने तुझ्यावर दडपण आहे काय, असा सवाल करताच रिद्धिमान म्हणाला,‘‘मी किंवा नमन दोघांनीही सर्वोत्तम योगदान दिले. भारताला विजय मिळाला. कोण खेळेल हे निश्चित करण्याची जबाबदारी आमच्या दोघांचीही नाही. चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे.’’ (वृत्तसंस्था)