शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीने ब्राझीलमध्ये झाली वाहतूक क्रांती

By admin | Updated: August 12, 2016 21:48 IST

ब्राझीलमधील आॅलिम्पिकसाठी आलेल्यांचा प्रवास बीआरटी सेवेमुळे सुकर झाला

शिवाजी गोरे,(थेट रियो येथून)  

भारतासारखाच विकसनशील देश असणारा ब्राझील. आपल्यासारख्या अनेक प्रश्नांनी त्रासलेला आहे. मात्र, एका गोष्टीत ब्राझीलने प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. अगदी वाहतूक क्रांतीच झाली आहे. हे घडले आहे ते बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) सेवेमुळे. ब्राझीलमधील आॅलिम्पिकसाठी आलेल्यांचा प्रवास बीआरटी सेवेमुळे सुकर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बीआरटी सेवेबाबत ओरड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलमध्ये १९७४ पासून बीआरटी सेवेला सुरुवात झाली. क्युरिताबा हे शहर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे केंद्र होते. फुटबॉलचा येथील उत्साह सर्वांना माहीतच आहे. त्यासाठी खास बीआरटी आणण्यात आली. यशस्वीही झाली. सध्या ब्राझीलमधील ३३ शहरात बीआरटी सध्या सुरू आहे. त्यातून रोज ३१.७ मिलियन नागरिक प्रवास करीत आहेत. जगात १८६ शहरांमध्ये बीआरटीचा प्रवास सुरू असून त्यातील ६० शहरे ब्राझीलमध्ये जगात असलेल्या ६ महाद्विपांमध्ये सुमारे १९.७ मिलियन नागरिक रोज प्रवास करीत आहेत. ब्राझीलच्या ग्रामीण भागात सुद्धा बीआरटी पोहोचली आहे. या गावांमधून शहरात येण्या-जाण्यासाठी येथील नागरीक बीआरटीमधूनच प्रवास करतात. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या बीआरटीने आम्ही प्रवास केला. नागरिकांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी सांगितले की, बीआरटी एक वरदान आहे. ब्राझीलचे प्रत्येक शहर ग्रामीण भागातील गावांनी या बीआरटीमुळे जोडले गेले आहे. देशांतर्गत तुम्ही जलद प्रवास करू शकता. बीआरटी लेनमध्ये इतर कोणतेही वाहन येऊ शकत नाही. हा मार्ग पूर्ण वेगळा आणि मुख्य म्हणजे मोकळा असतो. खासगी बस सेवा करणाऱ्या बसेस, ब्राझील शासनाच्या व प्रत्येक नगरपालिकेच्या बसेस अथवा रुग्णवाहिकाही या मार्गातून जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे बीआरटीचा दरही परवडणारा आहे. कमीत कमी ३.२५ रियाल (म्हणजे भारती चलनाप्रमाणे ९० रूपये २५ पैसे) असा दर आहे. ब्राझीलच्या बीआरटीची आणि पुण्यातील बीआरटीची तुलना केली तर पूण्यातील बीआरटी रस्त्यांवरून एसटी, पीएमटी खासगी गाड्या, मोटारसायकली, काही वेळेस सायकलीसुद्धा जात असतात. त्यातच जर एखाद्या मंत्र्याचा दौरा असेल तर त्यांच्या गाड्यांचा ताफाही बीआरटीतून जातो. ब्राझीलमध्ये अगदी पंतप्रधानांची गाडीही बीआरटीमधून जाऊ शकत नाही. बीआरटीच्या गाड्याही अत्यंत स्वच्छ आणि चकचकीत असतात. त्यामुळे प्रवास हा एक सुखकर अनुभव होत आहे.