शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘गोल्डन बॉय’वर मजुरी करण्याची वेळ !

By admin | Updated: February 11, 2016 03:24 IST

एकेकावर काय वेळ येते पाहा, नियतीचा खेळच विचित्र. शांघाय स्पेशल आॅलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावलेला अपंग अ‍ॅथलिट पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतोय.

लखनौ : एकेकावर काय वेळ येते पाहा, नियतीचा खेळच विचित्र. शांघाय स्पेशल आॅलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावलेला अपंग अ‍ॅथलिट पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतोय. हामिद नावाच्या या ‘विशेष’ खेळाडूची ही व्यथा. लखनौच्या अलिगंज येथे राहणाऱ्या ३० वर्षीय हामिदने आक्टोबर २००७ मध्ये शांघाय (चीन) येथील ‘स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड समर’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. निश्चित हा क्षण देशवासियांसाठी अभिमानास्पद होता. मात्र, या ‘सुवर्ण’ यशाानंतरही हामिदच्या जीवनात मात्र सोनेरी दिवस आलेच नाहीत.हामिदची आई हदीकुन्निसा हिने वृत्तसंस्थेला सांगितले की, मानसिकदृष्ट्या विकलांग; पण बहुमुखी प्रतिभेचा धनी असलेल्या तिच्या मुलाने जेव्हा शांघाय येथील स्पर्धेत शर्यत, उंच उडी आणि गोळाफेकमध्ये विजयाचे झेंडे रोवले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांना निवासस्थानी चहापानासाठी आमंत्रित केले होते. तेव्हा हामिदला नोकरी आणि रोख पुरस्कार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले. हदीकुन्निसा म्हणाल्या, हामिदचे वडील काही वर्षांपूर्वीच मरण पावले. वृद्धापकाळामुळे त्यांना आता संसाराचा गाडा ओढता येत नाही. त्यामुळे दोन वेळच्या जेवणासाठी हामिदला मजुरी करावी लागत आहे. हामिदसोबत शांघाय येथे गेलेले त्याचे प्रशिक्षक एजाज यांनी सांगितले की, स्पेशल आॅलिम्पिकच्या पाच स्पर्धांत सहभागी होणारा तो भारताचा एकमवे खेळाडू आहे.प्रतिभासंपन्न तसेच खूप समजदार आहे. केवळ त्याला आसऱ्याची गरज आहे. त्याला स्थानिक नोकरी मिळाली तर त्याचे जीवन सार्थ होईल. मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठी काम करणाऱ्या ‘चेतना’ या संस्थेत त्याची आई हामिदला घेऊन आली होती. येथेच त्याच्यातील खेळकौशल्य विकसित झाले आहे.