शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विजयसोबत मोठ्या भागीदाऱ्या पहायला मिळतील

By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST

सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला.

फतुल्लाह : सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला. धवनने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात १७३ धावांची खेळी केली. धवनने विजयसोबत (१५०) सलामीला २८३ धावांची भागीदारी केली. भारताने पहिला डाव ६ बाद ४६२ धावसंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने ३ बाद १११ धावांची मजल मारली. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘हा माझा १४ वा कसोटी सामना आहे. गेल्या दौऱ्यात बरेच काही शिकायला मिळाले. भविष्यात माझ्यात व विजयमध्ये मोठ्या भागीदारी बघायला मिळतील.’’धवनने त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. धवन म्हणाला, ‘‘विराट चांगला कर्णधार आहे. त्याचा सहकाऱ्यांवर विश्वास आहे. नेहमी विजयासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे शेवटी निकाल काय मिळतो, याचा विचार करीत नाही. त्याचे आमच्यासोबत मित्रत्वाचे नाते आहे.’’पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत २०० षटकांचा खेळ वाया गेला. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चांगली कामगिरी करताना बांगलादेशचा पहिला गडी झटपट बाद केला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली. खान साहेब उस्मान अली स्टेडियममधील पाटा खेळपट्टीबाबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘ही फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी असून, आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. आम्ही तीन बळी घेतले आहेत. विश्वकप स्पर्धेसाठी असलेल्या खेळपट्ट्यांवर चेंडूला उसळी मिळत होती व स्विंगही मिळत होता. पण, येथे दोन-तीन षटकांनंतरच फटके खेळता येईल, याचा मला अंदाज आला. यानंतर सर्व काही अनुकूल घडले.’’धवन म्हणाला, ‘‘या लढतीपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी निराशाजनक होती. मी संघसंचालक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफचा आभारी आहे. रवी शास्त्री यांचा संघावर विशेष प्रभाव आहे. ज्या वेळी मी आॅस्ट्रेलियात निराशाजनक कालखंडातून मार्गक्रमण करीत होतो त्या वेळी सर्व सपोर्ट स्टाफने माझी पाठराखण केली. त्यामुळे मला धावा फटकावण्यात यश आले.’’धवन पुढे म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी चांगली ठरत नव्हती; पण या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरल्यामुळे समाधानी आहे. (वृत्तसंस्था)