शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कुंबळेबाबत काहीच अडचण नाही : कोहली

By admin | Updated: June 4, 2017 06:00 IST

भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक अनिल कुंबळेशी कुठलाही वाद असल्याचे वृत्त फेटाळून लावले. मुख्य प्रशिक्षकासोबत मला कुठलीच समस्या नव्हती

बर्मिंघम : भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक अनिल कुंबळेशी कुठलाही वाद असल्याचे वृत्त फेटाळून लावले. मुख्य प्रशिक्षकासोबत मला कुठलीच समस्या नव्हती आणि ही पूर्ण घटना केवळ अफवा आहे, असे कोहली म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सलामी लढतीपूर्वी पत्रकारांसोबत बोलताना कोहली म्हणाला, ‘बरीच चर्चा रंगविण्यात आली. जे लोक चेंज रुमचे सदस्य नव्हते त्यांनी बरेच काही लिहिले. ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. असे काहीच घडले नाही.’कुंबळेसोबत गेल्या मोसमातील प्रवास शानदार असल्याचे सांगताना कोहली म्हणाला, ‘कुठल्याही प्रकरणावर टिपणी करताना अचूक माहिती असणे आवश्यक आहे.’कोहलीने मीडियावर भाष्य करताना म्हटले की, ‘ज्या बाबी मला माहीत नाहीत त्यावर मी भाष्य करणार नाही. माझ्या मते सध्या धैर्याची उणीव असून कुणीच आपली चूक कबूल करण्यास तयार नाही. जर मीडियाने काही बाबी लिहिल्या आणि त्या चुकीच्या ठरल्या तर मीडिया चूक कबूल न करता समस्येचे निवारण झाल्याचे वृत्त देईल. किमान आपली चूक झाली हे तर स्वीकारायला हवे.’कोहलीने आमचा संघ एका कुटुंबाप्रमाणे असल्याचे सांगत यात एकमेकांच्या विचारावर असहमती असू शकते, असे सांगितले. (वृत्तसंस्था)प्रशिक्षक निवडीसाठी एक प्रक्रिया असल्याचे सांगताना विराटने त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. महत्त्वाची स्पर्धा सुरू असताना काही लोक अफवा पसरवत आहेत. आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मैदानावर दडपण येणार नाही, यासाठी प्रयत्नशील असतो. पाकविरुद्धची लढत अन्य संघांसोबतच्या लढतीप्रमाणेच असते. कुठल्याही संघासोबत खेळताना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो.’ (वृत्तसंस्था)गोलंदाजीत पर्याय असणे चांगले : कोहली- चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी ‘परफेक्ट’ गोलंदाजी संयोजनाची निवड करणे ‘चांगली डोकेदुखी’ असल्याचे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. - विराट म्हणाला,‘गेल्या पाच-सहा दिवसांपासून माझ्या मनात हा विचार घोळत आहे. सराव सामन्यांत सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारताची गोलंदाजीची बाजू संतुलित भासत आहे. एका अष्टपैलू खेळाडूव्यतिरिक्त संघात कुणाची निवड करायची हा चांगला प्रश्न आहे. कारण केवळ चारच गोलंदाजांना संधी देता येईल. - संघाचा समतोल साधण्यासाठी सर्वच पर्याय खुले आहेत. त्यात दोन फिरकीपटू-दोन वेगवान गोलंदाज, तीन वेगवान गोलंदाज हार्दिक आणि एक फिरकीपटू. खेळपट्टीचे स्वरूप कसे राहील आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध काय योग्य असेल, याचा विचार केल्यानंतरच संघाची निवड करण्यात येईल.’