शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

थारिंडुचे चेन्नईत होणार गोलंदाजी शैलीचे परीक्षण

By admin | Updated: September 7, 2015 00:06 IST

भारताविरुद्ध मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत संशयित गोलंदाजी शैलीच्या आरोपाचा सामना करणाऱ्या श्रीलंकन आॅफस्पिनर थारिंडू कौशल याचे चेन्नईत

चेन्नई : भारताविरुद्ध मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत संशयित गोलंदाजी शैलीच्या आरोपाचा सामना करणाऱ्या श्रीलंकन आॅफस्पिनर थारिंडू कौशल याचे चेन्नईत श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी लॅबमध्ये गोलंदाजी शैलीचे परीक्षण होणार आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत संशयित गोलंदाजी शैलीच्या परीक्षणासाठी थारिंडू १३ सप्टेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहे. थारिंडूची गोलंदाजी शैली एसएससी स्टेडियममध्ये तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीनंतर संशयित असल्याचे आढळले होते.२२ वर्षीय श्रीलंकन गोलंदाजासोबत श्रीलंकन क्रिकेट (एसएलसी)चे कोचिंगप्रमुख जेरोम जयरत्नेदेखील भारतात येणार आहेत. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या थारिंडूने श्रीलंकेकडून सहा कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन निवृत्त झाल्यानंतर थारिंडूला राष्ट्रीय संघातील पुढील प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून मानले जात आहे; परंतु आक्षेपार्ह गोलंदाजी शैलीच्या आरोपामुळे त्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत थारिंडूची कामगिरी लाजवाब ठरली होती आणि त्याने ३८.१५ च्या सरासरीने १३ गडी बाद केले होते. गेल्या १६ महिन्यांत थारिंडू श्रीलंकेतील गोलंदाजी शैली संशयित असल्याचा आरोप असणारा दुसरा आॅफस्पिनर आहे. याआधी गेल्या वर्षी मे महिन्यात इंग्लंडमध्ये सचित्र सेनानायके याची गोलंदाजी शैलीदेखील बेकायदेशीर असल्याचे आढळले होते. (वृत्तसंस्था)