शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर विघ्नेश देवळेकरचा डबल धमाका

By admin | Updated: March 20, 2017 21:32 IST

विघ्नेशने कलकत्ता येथे झालेल्या पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या गटात सुवर्णपदक पटाकवत नवा विक्रम प्रस्थापित केला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 : ठाण्याच्या विघ्नेश देवळेकरने अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी विजय मिळवत डबल धमाका केला. विघ्नेशने कलकत्ता येथे झालेल्या पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या गटात सुवर्णपदक पटाकवत नवा विक्रम प्रस्थापित केला.ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेंतर्गत २० वर्षीय विघ्नेशने आक्रमक दर्जेदार खेळामुळे अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. स्पर्धेत विघ्नेश-सौरभ शर्मा जोडीला दुसरे मानांकन देण्यात आले. अंतिम सामन्यात विघ्नेश-सौरभ जोडीचा सामना अनुभवी चेतन आनंद-डीजू जोडीशी झाला. पहिल्या सेटमध्ये विघ्नेश-सौरभ जोडीने २१-१५ असा विजय मिळवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये चेतन-डीजू जोडीने कडवी झुंज दिली. मात्र कोर्टावर उत्तम पदलालित्य , आक्रमक आणि बचावात्मक फटक्यांचा प्रभावी वापर करत विघ्नेश-सौरभ जोडीने २७-२५ असा विजय मिळवत. तत्पुर्वी, उपांत्य फेरीत विघ्नेश-सौरभ जोडीने अव्वल मानांकित अरुण जॉर्ज-शिवम शर्मा या जोडीचा २१-१५, २१-१२ असा धुव्वा उडवत धक्कादायक विजयाची नोंद केली.मिश्र दुहेरी गटात विजयासाठी विघ्नेश- व्ही.हरिका जोडीला सौरभ शर्मा-अनुष्का पारेख जोडीने कडवी झुंज दिली. १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक सेटमध्ये विघ्नेश-हरिकाने कोणताही दबाव न घेता नैसर्गिक खेळावर भर दिला. अखेर निर्णायक सेटमध्ये २१-९ असे शानदार वर्चस्व राखत सुवर्ण पदाकाला गवसणी घातली. उपांत्य फेरीत विघ्नेश-हरिका जोडीने रेल्वेच्या अर्जुनकुमार रेड्डी- धन्या नायर जोडीचा २२-२०, १०-२१, २१-१५ असा पराभव केला.आगामी उत्तरप्रदेश मधील बरेली येथील राष्ट्रीय स्पर्धा आणि दिल्लीतील सुपर सिरीजमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी विघ्नेश कसून सराव करत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)..................................विघ्नेशच्या कारकिर्दीवर नजरआंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धा (बेहरीन)आंतरराष्ट्रीय सीरीज स्पर्धा (पोलंड)आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा (हैद्रराबाद)आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा (मुंबई )राष्ट्रीय वरिष्ठ मानांकित वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा (वलसाड, गुजरात)राज्य बॅडमिंटन स्पर्धा, (कनिष्ठ गट)......................................