शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तेलगू टायटन्स, पिक पँथर संघ विजयी

By admin | Updated: February 1, 2016 02:31 IST

राहुल चौधरीने शेवटच्या चढाईत मिळविलेल्या १ गुणाच्या जोरावर तेलगू टायटन्स संघाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन संघाचा २७-२६ गुणांनी पराभव केला.

विशाखापटणम् : राहुल चौधरीने शेवटच्या चढाईत मिळविलेल्या १ गुणाच्या जोरावर तेलगू टायटन्स संघाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन संघाचा २७-२६ गुणांनी पराभव केला. दुसरीकडे अभिषेक बच्चनच्या मालकीचा जयपूर पिक पँथर संघाने गतविजेत्या यू मुंबा संघाला २७-१८ गुणांनी नमविले. राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या लढतीत मनजीत चिल्लरच्या उत्कृष्ट खेळीमुळे पुणेरी पलटन संघाने मध्यंतरापर्यंत १७-१४ गुणांची आघाडी घेतली होती. या वेळेत मनजीतने ८ गुण मिळविले. १९ व्या मिनिटाला पुणेरी पलटनने तेलगू संघावर लोन चढविला परंतु, मध्यंतरानंतर तेलगू टायटन्सचा खेळाडू सुकेश हेगडे आणि राहुल चौधरी यांनी आक्रमक चढाया आणि नेत्रदीपक पकडी करून गुणांची बरोबरी आणली. पुणेरी पलटनकडे २५-२३ अशी आघाडी असताना सुकेश हेगडेने दोन गुण मिळवून २५-२५ बरोबरी केली. राहुल चौधरीनेसुद्धा १ गुण घेतला. तेव्हा तेलगूकडे १ गुणाची आघाडी आली. नंतर पुणे संघाकडून १ गुण मिळविला गेल्यामुळे गुण संख्या २६-२६ झाली. शेवटच्या चढाईत सुकेशने पुन्हा गुण मिळविला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)