शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सांघिक कामगिरीच्या जोरावर जेतेपद पटकावता येते : रोहित

By admin | Updated: May 23, 2017 04:42 IST

वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर संघासाठी काही सामने जिंकता येतात, पण स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज असते

हैदराबाद : वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर संघासाठी काही सामने जिंकता येतात, पण स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज असते, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. रविवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने आपल्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रविवारी रात्री कमी धावसंख्येच्या अंतिम लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटचा एका धावेने पराभव करीत जेतेपद पटकावले. सामन्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना रोहित म्हणाला, ‘‘माझ्या मते वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर तुम्ही संघासाठी काही सामने जिंकू शकता, पण चॅम्पियन होण्यासाठी सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरते. संघाची तिन्ही विजेतीपदे विशेष आहेत. स्पर्धेपूर्वीच संघाचा योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे.’’रोहितने आॅस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनची प्रशंसा करताना सांगितले, ‘आमच्या संघात स्वत:ला सिद्ध केलेले मॅचविनर आहेत. मिशेल जॉन्सनने यापूर्वी अनेकदा सिद्ध केले आहे.’ ‘आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. मुंबईचे प्रतिनिधित्व करतानाही पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. अखेरचे षटक महत्त्वाचे होते. मोक्याच्या क्षणी त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. पूर्ण मोसमात त्याची उपस्थिती महत्त्वाची ठरली.’मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२९ धावांची मजल मारली. रोहितच्या मते या खेळपट्टीवर आम्ही ३०-४० धावा कमी केल्या. रोहित म्हणाला, ‘‘या खेळपट्टीवर १४०-१६० धावा फटकावण्याचे आमचे लक्ष्य होते. कृणाल पांड्याने ४७ धावांची खेळी केल्यामुळे संघाला १२९ धावांची मजल मारता आली. कृणाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. लसिथ मलिंगा व जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर्समध्ये सर्वोत्तम गोलंदाज आहेत.’’भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविण्याची इच्छा आहे का, याबाबत बोलताना रोहित म्हणाला, ‘‘हा प्रश्न फार पुढचा विचार करण्यासारखा आहे. मी फार पुढील विचार करीत नाही. ज्या वेळी संधी मिळते त्या वेळी त्याचे सोने करण्यास प्रयत्नशील असतो.’’ (वृत्तसंस्था)