शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची फिटनेस टेस्ट

By admin | Updated: May 27, 2015 01:35 IST

इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाच्या समारोपानंतर बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाच्या समारोपानंतर बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूवी सर्व खेळाडूंची तंदुरुस्त चाचणी होणार असून, यापूर्वी दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंची फिटनेस चाचणी घेतली जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ६ जून रोजी खेळाडूंची फिटनेस चाचणी होण्याची शक्यता आहे. ठाकूर म्हणाले, ‘५ जून रोजी संघातील सर्व खेळाडू कोलकाता येथे येणार असून, एक कसोटी व ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी ७ जून रोजी भारतीय संघ बांगलादेशला रवाना होणार आहे. दौऱ्यादरम्यान खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याचा अनुभव असल्यामुळे या वेळी हे पाऊल उचलण्यात आले आहे.’ आॅस्ट्रेलियात विश्वकप स्पर्धेपूर्वी चार कसोटी व तिरंगी मालिकेदरम्यान रवींद्र जडेजा व भुवनेश्वर कुमार यांना दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले होते. आयपीएलचे आठवे पर्व रविवारी संपले. अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले. नियमानुसार बीसीसीआयला प्रत्येक फ्रॅन्चायझीकडून खेळाडूंच्या फिटनेसबाबत माहिती मिळते; पण या वेळी प्रथमच बोर्डाने दौऱ्यावर पाठवण्यापूर्वी संघाची फिटनेस चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी, सोमवारी आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी फिटनेसबाबत तक्रार असेल तर बीसीसीआयच्या सचिवांना कळवण्याचे आवाहन सर्व खेळाडूंना केलेले आहे. भारतात प्रतिभावान खेळाडूंची उणीव नसून अनेक खेळाडू संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असेही शुक्ला यांनी या वेळी सांगितले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सचिव ठाकूर म्हणाले, ‘भारतीय संघाचे प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीबाबतचा निर्णय ६ जूनपर्यंत घेण्यात येईल’. (वृत्तसंस्था)