शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखतीविनाच होणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकांची नियुक्ती?

By admin | Updated: July 9, 2017 10:05 IST

अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सध्या जोरदार काथ्याकूट सुरू आहे. आता बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक निवडीसाठी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 -  अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सध्या जोरदार काथ्याकूट सुरू आहे. आता बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक निवडीसाठी मुलाखत न घेताच मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी प्रशिक्षक निवडीनंतर सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात झालेल्या विवादानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बोर्ड हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
 यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या वृत्तानुसार प्रशिक्षकाच्या नियुक्तीच्या पद्धतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार क्रिकेट सल्लागार समितीला दिले आहेत. या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितल्यानुसार प्रशिक्षकपदासाठी मुलाखतीची पद्धत रद्द करण्यासाठी चर्चा झाली.  
मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणारे उमेदवार निवडप्रक्रियेसाठी आपल्या प्रेझेंटेशनसह तयार आहेत. मात्र निवड प्रक्रिया कशी होईल, याबाबत इच्छुक उमेदवारांना अद्याप काहीही माहिती नाही. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै आहेत. दरम्यान, प्रशिक्षकाची निवड प्रक्रिया 10 जुलैला मुंबईत पूर्ण केली जाईल, असे सौरव गांगुली म्हणाला होता.  अधिक वाचा : ( भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्री सर्वात पुढे )( मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेचा अनुभव कमी)
 
मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना इच्छुक उमेदवारांच्या क्षमतेची माहिती आहे. त्यामुळे उमेदवारांनी पाठवलेल्या कागदपत्रांच्या छाननीनंतर मुलाखतीसाठी वेगळे बोलवण्याची गरज वाटत नाही, असे मंडळाचे मत आहे. आता क्रिकेट सल्लागार समितीची बैठक उद्या होणार आहे. त्यात मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.