शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडिया ‘फ्रंट फुटवर’

By admin | Updated: June 4, 2017 06:07 IST

चॅम्पियन्स चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पाकिस्तानचा संघ ‘रिबिल्ड’ होत आहे. काही नवे खेळाडू तर काहींच्या पुनरागमनामुळे

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)चॅम्पियन्स चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पाकिस्तानचा संघ ‘रिबिल्ड’ होत आहे. काही नवे खेळाडू तर काहींच्या पुनरागमनामुळे हा संघ नव्या दमात दिसतोय. अझर अली, जुनेद खान, मोहम्मद आमिर यांच्यासारखे महत्त्वपूर्ण खेळाडू त्यांच्याकडे आहेत. परंतु, कागदावर तुलना केली तर भारतीय संघच वरचढ आहे. कर्णधार विराट कोहली चांगला खेळतोय. शिखर धवनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यापूर्वी, मनात भीती असायची की, पाकचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना त्रस्त करतील. परंतु, आता भारताकडेही चांगले गोलंदाज आहेत. ते सुद्धा पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. एक समस्या असू शकते ती म्हणजे ‘ओपनिंग’ची. या जोडीतील कॉम्बिनेशन अजून जुळलेले नाही. त्यामुळे भारतीय संघापुढे सलामी जोडीचा प्रश्न असेल. असे असले तरी भारतीय फलंदाजी चांगली आहे. ‘आॅलराउंडर’ चांगले आहेत. इतिहासातील प्रदर्शन पाहिले तर भारतीय संघ वरचढ ठरलेला आहे. २०१५ च्या विश्वचषकात आणि टी-२० विश्वचषकातही भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे भारताला ‘अ‍ॅडव्हॉटेन्ज’ आहे असे मला वाटते. सुप्रसिद्ध इतिहासकार तसेच सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देत ‘तहलका’ निर्माण केला. जी समिती सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केली होती. ५-६ पानांच्या पत्रात गुहा यांनी काही गोष्टी नमूद केल्या. त्यात बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा भोंगळ कारभार, भारतीय क्रि केट हे दिग्गज खेळाडूंच्या प्रभावाखाली (सुपरस्टार संस्कृती) असून, कर्णधार विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्यावरही नाव न घेता तोफ डागली. हे सर्व प्रश्न २०-२५ वर्षांपासून गाजत आहेत. मात्र, यावेळी गुहा हे प्रशासकीय समितीचे सदस्य असल्याने या प्रश्नाकडे सर्वाेच्च न्यायालय गांभीर्याने घेईल. त्यामुळे पुढे काय घडते याकडे लक्ष असेल. त्यांची पूर्ण तक्रार बघितली तर प्रशासकीय समितीविरुद्ध आहे.दुसरीकडे, विराट-कुंबळे यांच्यातील वादाचा फटका चॅम्पियन्स चषकावर पडणार काय? भारत-पाक सामन्यावरही त्याचा परिणाम होईल काय, हे सुद्धा पाहावे लागेल. पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. त्यांनतर पुढे होणारे सामनेही महत्त्वाचे आहे. कारण एका सामन्यामुळे तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. कुंबळे-विराट दोन्ही खेळाडू महान आहेत. त्यांच्यातील वाद बातचीत करून मिटायला हवा. तो मिटलेला नसावा, असे मला वाटते. पण त्याचा परिणाम प्रदर्शनावर होता कामा नये. कारण कुंबळे किंवा विराट हे संघाला एकटे जिंकून देऊ शकत नाहीत. आशा आहे, की भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेन. निश्चितपणे, टीम इंडिया मजबूत आहे.