चार वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये उपविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाला ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाविना परतावे लागणार आहे. प्ले आॅफ मध्ये भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियातर्फे जियू झांग ने अनुक्रमे शमिनी व मधुरिका पाटकर यांच्याविरुद्ध एकेरीच्या लढतीत सरशी साधली आणि आॅस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाटकर व कुमारेसनने दुहेरीच्या लढतीत जियान फांग ले व मियाओ मियाओचा पराभव केला होता.
टेटे : भारतीय महिला पराभूत
By admin | Updated: July 28, 2014 03:41 IST