शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

टार्गेट इंडोनेशिया ओपन

By admin | Updated: December 1, 2015 03:18 IST

मकाऊ ग्रांप्रीमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी करणारी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दुखापतीतून सावरत शानदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : मकाऊ ग्रांप्रीमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी करणारी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दुखापतीतून सावरत शानदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळणाऱ्या सिंधूला डेन्मार्क ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या निमित्ताने सुपर सीरिज स्पर्धेत तिने प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. याव्यतिरिक्त सिंधूने मकाऊ ओपनमध्ये मोसमातील पहिले जेतेपद पटकावले. हैदराबादच्या या २०वर्षीय खेळाडूने आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या इंडोनेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. सिंंधू म्हणाली, ‘हा चांगला विजय आहे. मला आनंद झाला. आता माझे पुढचे लक्ष्य इंडोनेशिया आहे. मकाऊमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी करता आली. एकूण विचार करता माझी कामगिरी चांगली झाली. मितानी चांगली खेळाडू आहे. जपान ओपनमध्ये तिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तिचा पराभव करण्यात यश आल्यामुळे आनंद झाला.’सिंधू पुढे म्हणाली, ‘मला दुसरा गेम जिंकण्याची संधी होती; पण मोक्याच्या क्षणी दोन स्मॅश नेटमध्ये गेल्यामुळे निराश झाले. तिसऱ्या गेममध्ये आघाडी मिळवीत अखेरपर्यंत कायम राखली.’स्टेडियमबाबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘प्रत्येक वेळी शटलचा वेध घेणे अचडणीचे ठरत होते. सर्वांसाठी सारखीच परिस्थिती असल्यामुळे आम्ही तक्रार करू शकत नाही.’आगामी सत्राबाबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘जानेवारी महिन्यात लीग स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. त्यानंतर सैयद मोदी, इंडियन ओपन, आदी स्पर्धेत सहभागी होणार आहे. आॅलिम्पिकचे वर्ष असल्यामुळे प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची आहे. कामगिरीचा आलेख उंचाविण्यात यश येईल, अशी आशा आहे. यंदाच्या मोसमात सिंधूला कामगिरीमध्ये चढ-उतार अनुभवावे लागले. पायाच्या दुखापतीमुळे तिला आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप आणि इंडिया ओपन यासारख्या अनेक महत्त्वांच्या स्पर्धांना मुकावे लागले. पुनरागमन करताना आॅस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि चीन ताइपे स्पर्धांमध्ये तिला लवकरच गाशा गुंडाळावा लागला. सिंधूने आॅलिम्पिक चॅम्पियन शुरुईचा पराभव केला; पण जपानच्या मितानीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुनरागमन करताना डेन्मार्क ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली. डेन्मार्कमध्ये कारकिर्दीत प्रथमच सुपर सीरिजचा अंतिम सामना खेळला. मकाऊमध्ये जेतेपदाचा मान मिळविला. सिंधू म्हणाली, ‘आघाडी मिळविल्यानंतर पराभव स्वीकारणे दु:खद असते. अनेक लढतींमध्ये याचा अनुभव आला. दुखापत कारकिर्दीचा एक भाग असतो. त्यावर नियंत्रण राखता येत नाही. मला तीन-चार महिने खेळता आले नाही. अशा स्थितीत संयम राखणे आवश्यक ठरते. पुनरागमन करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला.’ (वृत्तसंस्था)महासंघातर्फे गौरविण्यात येणारदरम्यान, भारतीय बॅडमिंटन महासंघाने मकाऊ ओपनमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूला १० लाख रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने सहावे मानांकन असलेल्या जपानाच्या मिनात्सू मितानीचा २१-९, २१-२३, २१-१४ ने पराभव करीत मकाऊ ओपनमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी केली. बाईचे अध्यक्ष अखिलेश दासगुप्ता म्हणाले, ‘सिंधूने पुन्हा एकदा आम्हाला आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली. जेतेपद राखण्यात ती यशस्वी ठरेल, याचा आम्हाला विश्वास होता. तिने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. आम्हाला तिच्या कामगिरीचा अभिमान असून, भविष्यात ती आणखी स्पर्धांमध्ये जेतेपद पटकाविण्यात यशस्वी ठरेल, अशी आम्हाला आशा आहे.’