मनौस : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ई गटात बुधवारी स्वित्ङरलड आणि होंडूरास या संघांत सामना रंगणार आह़े या लढतीत विजय मिळवून बाद फेरीत स्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने ‘स्वीस’संघ मैदानात पाऊल ठेवेल़ होंडूरास संघ स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत झाल्यामुळे स्पर्धेचा गोड शेवट करण्यासाठी प्रयत्नशील असेल़
या लढतीत विजय मिळाला, तर स्वित्ङरलड संघ स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचणार आह़े कारण, गोलच्या सरासरीत हा संघ इक्वेडोरच्या मागे आह़े त्यामुळे या सामन्यात उलटफेर झाल्यास स्वित्ङरलडचे पुढच्या फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकत़े
‘स्वीस’ संघाने आपल्या पहिल्या लढतीत इक्वाडोरला 2-1ने विजय मिळवला होता. दुस:या सामन्यात मात्र त्यांना मात खावी लागली होती़ आता स्वित्ङरलडला बाद फेरीत पोहोचण्यासाठी होंडूरासवर विजय मिळवावाच लागणार आह़े त्याचबरोबर दुस:या लढतीत फ्रान्सने इक्वाडोरला पराभूत करावे लागणार आह़े तेव्हाच स्वित्ङरलडचा बाद फेरीत प्रवेश निश्चित होणार आह़े
स्वित्ङरलडला संघ गत विश्वकपमध्ये पहिल्याच फेरीत बाहेर झाला होता,तर 2क्क्6मध्ये त्यांना दुस:या फेरीत युक्रेनकडून पराभव स्वीकारावा लागला होता़ जर होंडूरास ‘स्वीस’ संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला़ (वृत्तसंस्था)
स्वित्ङरलड आणि होंडूरास हे संघ गत विश्वचषकात आमने सामने आले होत़े
तेव्हा बाद फेरीत पोहोचायला स्वित्ङरलडला 2-क् ने विजयाची
गरज होती़
मात्र, दोन्ही संघातील ही लढत
क्-क् असा बरोबरीत सुटली होती़
त्यामुळे ‘स्वीस’ संघ पुढच्या फेरीत पोहोचू शकला नाही़