शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

आॅसींचा १३६ धावांत सफाया

By admin | Updated: July 30, 2015 01:26 IST

वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने लॉर्ड्स येथील सुमार कामगिरीची उणीव भरून काढताना आज येथे ४७ धावांत ६ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर इंग्लंडने

बर्मिंगहॅम : वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने लॉर्ड्स येथील सुमार कामगिरीची उणीव भरून काढताना आज येथे ४७ धावांत ६ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर इंग्लंडने तिसऱ्या अ‍ॅशेज कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाला पहिल्याच दिवशी १३६ धावांत गारद करण्यात यश मिळवले. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसअखेर ३ बाद १३३ धावा केल्या. ते अजूनही ३ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे ७ फलंदाज बाकी आहेत. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जो रुट ३0 व जॉने बेअरस्टॉ १ धावेवर खेळत होते. इंग्लंडने इयान बेल (५३), लिथ (१0) व अ‍ॅलेस्टर कुक (३४) हे तीन फलंदाज गमावले आहेत. आॅस्ट्रेलियाकडून लियोनने ३ धावांत २ गडी बाद केले.तत्पूर्वी, अँडरसनने लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीत १३७ धावा मोजल्या होत्या आणि त्याचे बळींचे खातेही कोरे होते; परंतु आज त्याने भेदक मारा करताना इंग्लंडची स्थिती मजबूत केली. एक वेळ तर त्याने अवघ्या १0 चेंडू आणि ७ धावांच्या आतच ४ गडी बाद केले होते. अँडरसनला दोन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज स्टिव्हन फिन (३८ धावांत २ बळी) आणि स्टुअर्ट ब्रॉड (४४ धावांत २ बळी) यांनी चांगली साथ दिली. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक याने फक्त या तीनच गोलंदाजांचा उपयोग केला. आॅस्ट्रेलियाकडून फक्त सलामीवीर ख्रिस रॉजर्सच झुंजार फलंदाजी करू शकला. त्याने आठव्या फलंदाजाच्या रूपात बाद होण्याआधी ५२ धावा केल्या. यासाठी त्याने ८९ चेंडूंचा सामना केला आणि ९ चौकार मारले. अन्य पाच फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले; परंतु त्यात अ‍ॅडम वोजेस (१६) याचा स्कोअर सर्वांत जास्त होता. त्याआधी ढगाळ हवामानातही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर (२), लॉडर््स कसोटीत द्विशतक ठोकणारा स्टिव्हन स्मिथ (७), कर्णधार मायकल क्लार्क यांना पहिल्या तासाच्या खेळातच गमावले. उपाहारापर्यंत आॅस्ट्रेलियाची ३ बाद ७२ अशी स्थिती होती.मार्क वूड याच्या जागी समावेश करण्यात आलेल्या फिनने पावसाचा व्यत्यय येण्याआधी आॅस्ट्रेलियाच्या गोटात सनसनाटी निर्माण केली. त्याने तीन षटकांत ६ धावांच्या आतच स्मिथ आणि क्लार्कला तंबूत धाडले. इंग्लंडला पहिले यश जेम्स अँडरसनने डावाच्या तिसऱ्या षटकात वॉर्नरला पायचीत करून मिळवून दिले. त्याचा हा ४0७ वा कसोटी बळी ठरला. पहिला बदल म्हणून आलेल्या फिनने त्याच्या पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असणारा कसोटी फलंदाज स्मिथला पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असणाऱ्या अ‍ॅलेस्टर कुककरवी झेलबाद केले. त्यानंतर क्लार्कचा त्रिफळा उडवताना आॅस्ट्रेलियाची ३ बाद ३४ अशी स्थिती केली. वोजेसने काही वेळपर्यंत रॉजर्सला साथ दिली; परंतु उपाहारानंतर तोही तंबूत परतला. अँडरसनने त्याच्या सलग चार षटकांत विकेट्स मिळवल्या. त्याने प्रथम वोजेसला यष्टिरक्षक बटलरकरवी झेलबाद केले आणि नंतर पुढच्या षटकात नवीन फलंदाज मिशेल मार्शलाही असेच बाद केले. मार्शला भोपळाही फोडता आला नाही.त्यानंतर ब्रॅड हॅडिनऐवजी पसंती मिळालेला पीटर नेविलही फलंदाजीत कमाल करू शकला नाही. अँडरसनने त्याला त्रिफळाबाद केले आणि मिशेल जॉन्सन (३) याला बाद करीत त्याचा पाचवा बळी मिळवला. त्याने नाथन लियोन (११) याला बाद करीत आॅस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३६.४ षटकांत सर्वबाद १३६.(रॉजर्स ५२, वोजेस १६. जेम्स अँडरसन ६/४७, स्टुअर्ट ब्रॉड २/४४, स्टीव्हन फिन २/३८). इंग्लंड : पहिला डाव : २९ षटकात ३ बाद १३३. (इयान बेल ५३, जो रुट खेळत आहे ३0, अ‍ॅलेस्टर कुक ३४. लियोन २/३, हेजलवूड १/५0).