शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

सनरायझर्स हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात गडी राखून विजय

By admin | Updated: April 18, 2016 23:37 IST

डेव्हिड वॉर्नरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर सात गडी राखून विजय मिऴविला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १८ - डेव्हिड वॉर्नरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने मुंबई  इंडियन्सवर सात गडी राखून दणदणीत विजय मिऴविला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने १७.३ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १४५ धावांचा पल्ला गाठला. डेव्हिड वॉर्नरने शानदार फटकेबाजी करताना चार षटकार आणि सात चौकार लगावत ५९ चेंडूत नाबाद ९० धावा केल्या. तर शिखर धवन अवघ्या दोन धावा काढून तंबूत परतला. मोझेस हेन्रिक्स (२०) आणि इऑन मार्गन ११ धावांवर बाद झाले. 
 
याआधी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मुंबई इंडियन्सने २० षटकात सहा बाद १४२ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. सलामीवीर मार्टिन गुप्टिल अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्याला गोलंदाज भुवनेश्वर कुमारने झेलबाद केले. फलंदाज अंबाती रायडूने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ४९ चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकार लगावत ५४ धावा केल्या. त्याला बरिंदर सरनने झेलबाद केले. कृणाल पंड्यानेही चांगली खेळी करत नाबाद ४९ धावा केल्या.  
 
पार्थिव पटेल १० धावावंर बाद झाला. तर रोहित शर्मा (५) आणि हार्दिक पंड्या दोन धावा काढून तंबूत परतला. हैदराबाद सनरायझर्सकडून गोलंदाज बरिंदर सरनने तीन बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने आणि मुस्तफिझूर रहमानने प्रत्येकी एक बळी घेतला. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाज टीम साउदीनेत तीन बळी घेतले.