शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सनरायजर्स लढणार प्ले आॅफसाठी

By admin | Updated: May 13, 2017 15:31 IST

आयपीएलच्या या सत्रात गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादचा प्ले आॅफमधील प्रवेश अखेरच्या सामन्यापर्यंत निश्चीत होऊ शकलेला नाही.

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमतकानपूर, दि. 13 - आयपीएलच्या या सत्रात गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादचा प्ले आॅफमधील प्रवेश अखेरच्या सामन्यापर्यंत निश्चीत होऊ शकलेला नाही. आज दुपारी ४ वाजता कानपूरच्या ग्रीन पार्कवर सनरायजर्स या सत्रातील साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना गुजरात लायन्स विरोधात खेळणार आहे. या सामन्यातील विजयावर सनरायजर्सचे प्लेआॅफचा प्रवेश अवलंबून आहे. तर गुजरात या  स्पर्धेत आधीच बाहेर पडला आहे.कानपूरचे ग्रीन पार्क हे सुरेश रैनाचे होमग्राउंड आहे. या सत्रात गुजरातची सांघिक कामगिरी चांगली झालेली नसली तरी रैना, मॅक्युलम, इशान किशन, कार्तिक, फिंच यांनी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांच्या तोंडचे पाणी अनेकदा पळवले आहे. त्यांनी दोनशेच्या वर धावसंख्या देखील नेली आहे. हे वॉर्नर आणि कंपनीला विसरुन चालणार नाही. मात्र त्यांची गोलंदाजी तशीफारशी मजबूत नाही. दिल्ली विरोधात त्यांनी २०८ आणि १९५ धावा केल्या होत्या मात्र या डोंगराएवढ्या धावसंख्येचा बचाव करणे गुजरातला दोन्ही वेळेस जमले नाही. दिल्लीच्या अनअनुभवी फलंदाजांनी दोन्ही वेळेस लायन्सची सहज शिकार केली.वॉर्नर, धवन, युवराज हे फॉर्ममध्ये असल्याने सनरायजर्सच्या व्यवस्थापनाला फारसे चिंतेचे कारण नाही. या दोन्ही संघात या आधी झालेल्या सामन्यात गुजरातने हैदराबादला फक्त १३८ धावांचे आव्हान दिले होते. हे माफक आव्हान वॉर्नर आणि हेन्रीक्स यांनी सहज पूर्ण केले होते.सनरायजर्सची गोलंदाजी आयपीएलच्या सर्व संघातील मजबूत गोलंदाजी मानली जाते. अनुभवी भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अफगाणचा युवा फिरकीपटू राशिद खान हे सनरायजर्सचे मुख्य अस्त्र आहे. बिपुल शर्माचा मारा देखील गुजरातला अडचणीत आणु शकतो. कोणत्याही परिस्थितीत हैदराबादला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यात हैदराबाद पराभूत झाल्यास प्ले आॅफमधील त्यांचा प्रवेश अडचणीत येऊ शकतो. पंजाबने तुफानी कामगिरी करत पाचवे स्थान गाठले आहे. हैदराबादचेआता १५ गुण आहेत आणि पंजाबचे १४ गुण आहेत. मात्र पंजाबने १४ मे रोजी पुण्यावर विजय मिळवला तर ते प्ले आॅफ गाठतील. आणि हैदराबाद बाहेर जाऊ शकेल. त्यामुळे हा सामना हैदराबादसाठी अटीतटीचा आहे.