यशासाठी शरीराची उंची नव्हे, तर दृढनिश्चयाची गरज असते: सतनाम
By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST
जयपूर: शरीराने उंचापुरा असो किंवा लहान, विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी ही दोन्हीही तत्त्वे आधारभूत नव्हेत़ यश गाठावयाचे असेल तर यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी करण्यासाठी ध्येय निश्चित करण्याचा संकल्प यालाच आधारभूत मानायला हवे, असे मत भारतीय मूलनिवासी अमेरिकेतील एनबीएचा बास्केटबॉलपटू सतनाम सिंग भामरा याने व्यक्त केले़ सतनाम जयपूरमधील एकलव्य सोसायटीकडून सवाई मानसिंग ...
यशासाठी शरीराची उंची नव्हे, तर दृढनिश्चयाची गरज असते: सतनाम
जयपूर: शरीराने उंचापुरा असो किंवा लहान, विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी ही दोन्हीही तत्त्वे आधारभूत नव्हेत़ यश गाठावयाचे असेल तर यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी करण्यासाठी ध्येय निश्चित करण्याचा संकल्प यालाच आधारभूत मानायला हवे, असे मत भारतीय मूलनिवासी अमेरिकेतील एनबीएचा बास्केटबॉलपटू सतनाम सिंग भामरा याने व्यक्त केले़ सतनाम जयपूरमधील एकलव्य सोसायटीकडून सवाई मानसिंग स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियमवर आयोजित एका कार्यक्रमप्रसंगी बोलत होता़ एनबीएमध्ये खेळल्यानंतर प्रथमच भारतात तो आला आहे़ त्याने युवकांसोबत काही क्षण बास्केटबॉल खेळामध्ये घालवला़