शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य यू मुंबाचा विजयी धडाका कायम

By admin | Updated: August 15, 2015 23:48 IST

प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना तगड्या पटणा पायरेट्सला ३२-२७ असे लोळवले.

बंगळुरु : प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना तगड्या पटणा पायरेट्सला ३२-२७ असे लोळवले. सुरुवातीला एकतर्फी झालेल्या या सामन्यात मध्यंतरानंतर पायरेट्सने कडवी झुंज दिली. मात्र मुंबईकरांच्या धडाक्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही.बंगळुरुच्या श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यू मुंबाने आक्रमण व बचाव याचा योग्य ताळमेळ साधताना एकहाती वर्चस्व राखले. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या पटणा पायरेट्स संघाचे खेळाडू संपुर्ण सामन्यात मुंबईकरांसमोर चाचपडताना दिसले. आक्रमक खेळ केलेल्या यू मुंबाने पायरेट्सवर दोन लोण चढवले. तर पायरेट्सने मुंबईकरांवर एकदा लोण चढवून सामन्यात पुनरागमन करण्याचा अपयशी प्रयत्न केला. मध्यंतराला मुंबईकरांनी १५-१२ अशी आघाडी घेऊन सामन्यावर पकड घेतली होती. हीच आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवताना यू मुंबाने शानदार बाजी मारली. दुसऱ्या सत्रात पटणाच्या संघाने पिछाडी भरुन काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र खोलवर चढाई करण्याच्या नादामध्ये मुंबईकरांच्या भक्कम बचावफळीचा ते सहज शिकार ठरले. यामुळे दबावाखाली आलेल्या पायरेट्सचे सामन्यावरील नियंत्रण सुटू लागले. ३९व्या मिनीटाला पायरेट्सने मुंबईवर लोण चढवून २७-२९ अशी पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर लगेच मुंबईकरांनी सलग ३ गुणांची कमाई करुन पायरेट्सची हवा काढली. तर सामन्याच्या अखेरच्या चढाईमध्ये कर्णधार अनुप कुमारने केवळ टाईमपास करुन मुंबईच्या विजयावर शिक्का मारला. मुंबईकडून अनुपचे आक्रमण व सुरेंद्र नाडा, मोहित चिल्लर यांचे बचाव निर्णायक ठरले. गिरीश एर्नाक व गुरविंदर सिंगने पायरेट्सकडून अपयशी झुंज दिली. प्रो-कबड्डी २0१५ साखळी गुणतक्तासंघाचे नाव सामने विजयी पराभूत गुणयू मुंबा१२१११५५तेलुगू टायटन्स१२७२४५बंगळुरु बुल्स१२७५३८जयपूर पिंक पॅँथर्स१२६५३६पटणा पायरेट्स१२५६३१दबंग दिल्ली१३४८२६बंगाल वॉरियर्स१३३९२२पुणेरी पलटण१०१८१४