शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बलाढ्य कोरियाची उपांत्य फेरीत धडक

By admin | Updated: October 17, 2016 04:51 IST

बलाढ्य कोरियाने नियोजनबद्ध खेळ करून तुलनेत दुबळ्या असलेल्या इंग्लंडला ५६-१७ असे लोळवले.

अहमदाबाद : बलाढ्य कोरियाने नियोजनबद्ध खेळ करून तुलनेत दुबळ्या असलेल्या इंग्लंडला ५६-१७ असे लोळवले. या विजयासह कोरियाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात २५ गुणांसह अव्वल स्थान निश्चित करीत उपांत्य फेरीत धडक मारली. सलामीच्या सामन्यात संभाव्य विजेत्या भारताला धक्का दिलेल्या कोरियाने विजयी घोडदौड कायम राखत भारताच्या गटविजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले. इंग्लंड संघात असलेल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंमुळे कोरियाने सावध खेळ करीत अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्लंडच्या चुकांमुळे कोरियाने सहजपणे गुणांचे खाते उघडत ७-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडवर लोण चढणार, असे दिसत असतानाच ९ व्या मिनिटाला तेजस देपलाच्या सुपर टॅकलमुळे इंग्लंडचे खाते उघडले. या वेळी इंग्लंडकडून पुनरागमनाची अपेक्षा होती.मध्यंतराला २७-४ अशी भलीमोठी आघाडी घेत कोरियाने विजय स्पष्ट केला. चेओल ग्यू शिन याने सर्वाधिक ११ गुणांसह इंग्लंडवर वर्चस्व राखले, तर, डाँग ग्यू किम (८), ग्यूंग ताइ किम (७) आणि याँग जू ओके (६) यांनीही चमकदार खेळ केला.इंग्लंडकडून तेजसने १० गुणांची कमाई करून एकाकी झुंज दिली. त्याला इतर खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. कोरियाने इंग्लंडवर ४ लोण चढवून आपला दबदबा राखला. (वृत्तसंस्था)केनियाने चमकदार विजय मिळवताना जपानचे कडवे आव्हान ४८-२७ असे परतवून सर्वांचे लक्ष वेधले. केनियाने यासह ‘ब’ गटात चौथे स्थान पटकावले आहे. मध्यंतराला १८-१४ असे वर्चस्व राखत केनियाने सामन्यावर पकड मिळवली.जेम्स ओबिलो याने भक्कम पकडी करताना ४ सुपर टॅकल करून १३ गुणांसह जपानचे आक्रमण रोखले. ओधिआम्बो ओगाक यानेही बचावात ७ गुण मिळवले. जपानकडून कझुहिरो तकानोने चांगला खेळला.>थायलंडकडून अमेरिका पराभूतथायलंडने ‘ब’ गटात द्वितीय स्थान पटकावताना अमेरिकेचा ६९-२२ असा धुव्वा उडवला. मध्यंतरालाच थायलंडने ४०-३ अशी तब्बल ३७ गुणांची आघाडी घेत अमेरिकेच्या आव्हानातली हवा काढली. विश्रांतीनंतर अमेरिकेने थोडाफार प्रतिकार केला, परंतु थायलंडच्या आक्रमकतेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. कर्णधार खोमसान थोंगखाम (१४) आणि चॅनविट विचियान (१२) यांनी थायलंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अमेरिकेकडून बिस्मार्क चार्ल्स (९) एकाकी लढला.