शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्ररक्षणातील अडथळ्यामुळे बाद होणारा स्टोक्स सहावा खेळाडू

By admin | Updated: September 7, 2015 00:08 IST

अष्टपैलू बेन स्टोक्स एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे (आॅबस्ट्रक्ंिटग द फिल्ड) बाद ठरवला गेलेला जगातील सहावा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला.

लंडन : अष्टपैलू बेन स्टोक्स एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे (आॅबस्ट्रक्ंिटग द फिल्ड) बाद ठरवला गेलेला जगातील सहावा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला.ही घटना इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी लॉर्डस् येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान झाली. आॅस्ट्रेलियाने हा सामना ६४ धावांनी जिंकला; परंतु स्टोक्सला ‘आॅबस्ट्रक्टिंग द फिल्ड’ बाद दिले गेल्यामुळे वाद निर्माण झाला. लॉर्डस्मध्ये झालेल्या सामन्यात ही घटना डावाच्या २६ व्या षटकात घडली. जेव्हा स्टोक्सने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने रोखला. डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने त्यानंतर चेंडू स्टोक्सकडे फेकला. तो चेंडू स्टोक्सने हाताने रोखला. स्टोक्सने धावबाद होण्याची शक्यता समाप्त केल्याचे अपील आॅस्ट्रेलियाने केले. त्यावर मैदानी पंच कुमार धर्मसेना आणि टीम रॉबिन्सन यांनी थर्ड अम्पायर जोएल विल्सन यांच्याकडे याविषयी सल्ला मागितला. थर्ड अम्पायरने अनेकदा रिप्ले पाहून स्टोक्स बाद असल्याचा निर्णय दिला. त्या वेळेस स्टोक्स दहा धावांवर होता. सामन्यानंतर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने थर्ड अम्पायरचे आणि त्यांच्या पंचांच्या निर्णयाचे समर्थन केले; परंतु स्टोक्सने हे जाणीवपूर्वक केले नसून त्याने स्वत:ला वाचविण्यासाठी असे केले, असे इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने सांगितले. या घटनेनंतर प्रेक्षकांनी आॅस्ट्रेलियन खेळाडू आणि विशेषत: स्टार्कच्याविरुद्ध घोषणा दिल्या.विशेष म्हणजे आशिया खंडाबाहेरील अशा पद्धतीने बाद दिला गेलेला बेन स्टोक्स हा पहिलाच फलंदाज ठरला. याआधी पाकिस्तानच्या चार आणि भारताच्या एका फलंदाजाला अशा प्रकारे बाद ठरविण्यात आले होते. क्षेत्ररक्षणात अडथळा आणणाऱ्या फलंदाजाला अशा प्रकारे बाद ठरवले जाते.पाकिस्तानचा रमीझ राजा अशा पद्धतीने बाद होणारा पहिला फलंदाज होता. १९८७ मध्ये भारताविरुद्ध कराचीत ९९ धावांवर असताना क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे पंचांनी त्याला बाद ठरवले होते. १९८९ मध्ये मोहिंदर अमरनाथला श्रीलंकेविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात ‘आॅबस्ट्रक्टिंग द फिल्ड’ बाद दिले गेले. पाकिस्तानचे अन्य तीन फलंदाज इंजमाम-उल-हक (विरुद्ध भारत, पेशावर २००८), मोहम्मद हाफीज (वि. दक्षिण आफ्रिका, दर्बन २०१३) आणि अन्वर अली (वि. दक्षिण आफ्रिका, पोर्ट आॅफ एलिझाबेथ) हेदेखील अशाच प्रकारे बाद झालेले आहेत. (वृत्तसंस्था)