शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

.. तरीही त्याने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले

By admin | Updated: January 9, 2017 00:55 IST

इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी प्रथमच भारतीय संघात निवड झालेला युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे.

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी प्रथमच भारतीय संघात निवड झालेला युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे. ऋषभने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करीत निवड समितीचे लक्ष वेधले. आक्रमक फलंदाज असा लौकिक असल्यामुळे पंतची संघात वर्णी लागली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १०२ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट १३० च्या जवळजवळ आहे. (वृत्तसंस्था)विवाह समारंभ सोडून क्रिकेटच्या सरावालाराजेंद्र पंत यांनी सांगितले की, ऋषभ बालपणापासून मेहनती आहे. लहानपणापासून त्याला क्रिकेटची आवड होती. शाळेतून आल्यानंतर तो घरी क्रिकेटचा सराव करीत होता. घरातील लोकांना तो गोलंदाजी करण्यास सांगत होता. तो चार-पाच वर्षांचा असताना त्याला कुटुंबातील एका विवाह समारंभासाठी घेऊन गेलो, पण काही वेळानंतर ऋषभ तेथे नव्हता. बराचवेळ शोधाशोध केल्यानंतर तो काही मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसला.लंगरमध्ये जेवण अन गुरुद्वारामध्ये घेतला आसरा01 - ऋषभ सरावादरम्यान गुरुद्वारामध्ये राहात होता आणि लंगरमध्ये भोजन करीत होता, अशी आठवण सरावासाठी ऋषभला रुडकीहून दिल्लीला यावे लागत होते. दिल्लीतील सोनेट क्लबचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी क्रिकेटपटूंसाठी एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. 02 -  त्या शिबिरात सहभागी होण्यासाठी ऋषभ रुडकीतून दिल्लीला आला होता. चमकदार कामगिरीमुळे त्याची सोनेट अकादमीमध्ये निवड झाली. येथे दर शनिवारी व रविवारी प्रशिक्षण दिल्या जात होते. ऋषभ शनिवारी सरावानंतर रात्री मोतीबाग येथील गुरुद्वारामध्ये थांबत होता. 03 - रविवारी सकाळी लंगरमध्ये भोजन केल्यानंतर सरावासाठी सोनेट क्लबमध्ये जात होता. रविवारी सराव संपल्यानंतर तो रुडकीला परत येत होता. हा क्रम अनेक महिने सुरू होता. त्यानंतर ऋषभ दिल्लीतील छतरपूर परिसरात किरायाच्या घरात राहायला लागला.