नाशिक : येथील नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटना व महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारपासून (दि. २५) राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. सदरची स्पर्धा पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात होणार असून, स्पर्धेचे उद्घाटन दुपारी १२ वाजता आमदार जयवंत जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गंधे, भीष्मराज बाम, क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून
By admin | Updated: June 23, 2014 22:51 IST