राज्य सायकल पोलो सामने
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
राज्य सायकल पोलो स्पर्धा
राज्य सायकल पोलो सामने
राज्य सायकल पोलो स्पर्धानागपूर : महाराष्ट्र राज्य सायकल पोलो संघटनेच्यावतीने नागपुरात ३५ वी ज्युनियर मुले, ३१ वी सब ज्युनियर मुले आणि १८ वी ज्युनियर मुलींच्या गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत अजनीच्या उर्दू हायस्कूल क्रीडांगणावर होत आहे. ज्युनियर गटासाठी ३१ डिसेंबर १९९६ नंतर जन्मलेले तसेच सब ज्युनियर गटासाठी ३१ डिसेंबर २००० नंतर जन्मलेले खेळाडू स्पर्धेसाठी पात्र ठरतील. ६०० खेळाडूंची या स्पर्धेत उपस्थिती राहील. त्यांची निवास व भोजन व्यवस्था रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार भवनात करण्यात येणार असल्याचे राज्य संघटनेचे सचिव गजानन बुरडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)