शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्कचा स्पार्क! बांगलादेश 182 धावांत गारद

By admin | Updated: June 5, 2017 21:42 IST

गोलंदाजांना अनुकूल अशा ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने केलेला भेदक मारा, त्याला हेझलवूड आणि कमिन्सकडून

ऑनलाइन लोकमत
ओव्हल (लंडन) दि. 5 -  गोलंदाजांना अनुकूल अशा ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने केलेला भेदक मारा, त्याला हेझलवूड आणि कमिन्सकडून मिळालेली उत्तम साथ याच्या जोरावर आयसीसी चॅंम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 182 धावांत गुंडाळले. 
 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा बांगलादेशचा निर्णय सपशेल चुकला. एकाकी झुंज देत 95 धावांची खेळी करणारा तमीम इक्बाल आणि 29 धावा काढणारा शाकिब अल हसन यांचा अपवाद वगळता बांगलादेशच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. 
 
17 व्या षटकात बांगलादेशचा डाव  3 बाद 53 असा अडखळल्यावर तमीम आणि शाकिबने बांगलादेशला सावरले.  या दोघांमध्ये 6 9 धावांची भागीदारीही झाली. पण शाकीब 29 धावा काढून बाद झाल्यावर बांगलादेशची पुन्हा घसरगुंडी उडाली. मात्र एक बाजून लावून घरणाऱ्या तमीमने संघाला 180 धावांपर्यंत पोहोचवले. पण शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच तमीम स्टार्कची शिकार झाला आणि त्यानंतर बांगलादेशचे उर्वरित तीन फलंदाज केवळ एका धावेची भर घालून माघारी परतले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने चार, झम्पाने दोन  तर हेझलवूड, कमिन्स,  हेड आणि हेन्रिक्स  यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले.