सेंट जोसफ कळंबोलीचे राज्यस्तरिय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत प्राविण्य
By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST
महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन आयोजित ३४ वी सबज्युनियर महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धा दिनांक १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या रोजी हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुक्यात आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत जवळजवळ २० पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या विजेता संघ पुणे सिटी चॅम्पीयन्सला २९-२४ आणि २९-२० या सरळ सेट मध्ये हरवत सेंट जोसफ कळंबोली संघाने कॉटर फायनलमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला २९-०५ आणि २९-१६ या फरकाने हरविले आणि सेमिफायनलमध्ये पुणे महानगर या संघाला २० - २७ व २९-२४ या सरळ सेटमध्ये हरविले. या स्पर्धेसाठी जोसफच्या शाळेतील मुलींनी भरपूर सराव व महेनत घेतली होती.
सेंट जोसफ कळंबोलीचे राज्यस्तरिय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत प्राविण्य
महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन आयोजित ३४ वी सबज्युनियर महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धा दिनांक १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या रोजी हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुक्यात आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत जवळजवळ २० पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या विजेता संघ पुणे सिटी चॅम्पीयन्सला २९-२४ आणि २९-२० या सरळ सेट मध्ये हरवत सेंट जोसफ कळंबोली संघाने कॉटर फायनलमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला २९-०५ आणि २९-१६ या फरकाने हरविले आणि सेमिफायनलमध्ये पुणे महानगर या संघाला २० - २७ व २९-२४ या सरळ सेटमध्ये हरविले. या स्पर्धेसाठी जोसफच्या शाळेतील मुलींनी भरपूर सराव व महेनत घेतली होती.या स्पर्धे जोसफ फक्त् रायगड जिल्हा संघ म्हणून नखेळता गेल्या वर्षीचे द्वितीय विजेतेपदाची वाटचाल करत या वर्षी (२०१४) अंतिम विजेता संघ म्हणून यशस्वी कामगिरी केली.आणि याचे सर्व श्रेय संघातील खेळाडू (मुली) प्रशिक्षक सौगत दत्ता, प्राचार्या मिरा कुंठे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जाते.विजेता संघ निकीता तावरे (कर्णधार), अंकिता आहेर, आकांक्षा शर्मा, आशिका शर्मा, सिफा पठाण, श्रृती होडबे, अंकिता माने, रिया रावतप्रशिक्षक सौगत दत्ता