मेलबर्न : ‘बीबीसीआय’चे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवास यांची गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयसीसीच्या 52 सदस्यांच्या परिषदेने प्रशासकीय नियमांच्या वादग्रस्त बदलास मंजुरी प्रदान केल्यानंतर श्रीनिवासन चेअरमनपदी विराजमान झाले. आमसभेने आजच घटनादुरुस्तीस मान्यता बहाल केली.
सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीवरून श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदापासून दूर राहण्यास सांगितले होते. तरीही आयसीसीत ते चेअरमनपदी आले हे विशेष. चेअरमन पदापासून रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे श्रीनिवासन यांचा चेअरमनपदाचा मार्ग मोकळा झाला. या बदलानंतर कार्यकारी स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार ‘बिग थ्री’ अर्थात भारत-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मिळतील.
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात श्रीनिवासन म्हणाले, ‘आयसीसीच्या चेअरमनपदी नियुक्ती होणो सन्मानजनक आहे. मी हा खेळ आणखी भक्कम करण्यास कसर शिल्लक राखणार नाही. क्रिकेटने लोकप्रियतेचे शिखर गाठावे व आयसीसीने यात मोलाची भूमिका बजावावी असे वाटते. या खेळात अधिक बलाढय़ संघ निर्माण व्हावेत अशी इच्छा आहे.’
श्रीनिवासन यांनी आयसीसीचे मावळते अध्यक्ष अॅलन इसाक
यांचे योगदानासाठी अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘इसाक आयसीसीला प्रेरणा देणारे प्रमुख ठरले. दोन वर्षाच्या
काळात त्यांनी तिन्ही प्रकारांत या
खेळाची लोकप्रियता वाढवली.’ आयसीसी संविधानात बदल
करण्याचा प्रस्ताव 8 एप्रिल रोजी सिंगापूर येथे सादर करण्यात आला.
1क् एप्रिल रोजी याला अंतिम रूप देण्यात आले. या बदलानंतर नवी कार्यकारी समिती स्थापन होईल आणि ती आयसीसी बोर्डाच्या अंतर्गत काम पाहील. कार्यकारी समितीचे पहिले ऑस्ट्रेलियाचे वॉली हॅमन्ड्स असतील. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जाईल्स क्लार्क हे आयसीसीच्या अर्थ व वाणिज्य समितीचे अध्यक्ष राहतील.
वार्षिक बैठकीदरम्यान बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी आयसीसीचे 11 वे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. ओमानला आयसीसीचा 38 वा सहयोगी सदस्य बनविण्यात आले तर ब्रुनेईचे अॅफिलिएट सदस्यपद निलंबित झाले. टोंगोला देखील अॅफिलिएट सदस्य यादीतून वगळण्यात आल्याने आयसीसीचे आता 1क्5 सदस्य उरले आहेत. (वृत्तसंस्था)