शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कर्स्टन

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

विश्वविजेतेपद कसे मिळवायचे याची भारताला कल्पना आहे : कर्स्टन

विश्वविजेतेपद कसे मिळवायचे याची भारताला कल्पना आहे : कर्स्टन
नवी दिल्ली : विश्वकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली असली तरी माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या मते भारताला जेतेपद राखण्याची चांगली संधी आहे. विश्वविजेतेपद कसे पटकवायचे, याची भारताला चांगली कल्पना आहे, असे कर्स्टन म्हणाले.
कर्स्टन यांनी सांगितले, 'भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीमुळे चाहते निराश आहेत, पण भारताला विश्वविजेतेपद कसे पटकवायचे, याची माहिती आहे. या विश्वकप स्पर्धेचा निकाल उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांवर अवलंबून राहणार आहे.'
२००८ ते २०११ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या कर्स्टन यांना चार वर्षांपूर्वी भारताने विश्वविजेतेपदाचा मान मिळविल्यानंतर सुरेश रैना, युसूफ पठाण व विराट कोहली यांनी खांद्यावर उचलले होते. भारतीय संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी खेळल्या जाणार्‍या लढतीबाबत सावध असावे, असे कर्स्टन यांनी म्हटले आहे.
कर्स्टन म्हणाले, 'पाकिस्तान संघात प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंबाबत अधिक माहिती नाही. संघाची यादी बघितल्यानंतर हा खेळाडू कोण आहे? हा खेळाडू कसा खेळतो? याबाबत तुमच्या मनात विचार येईल. त्यामुळे पाकिस्तान संघाला कमी लेखण्याची चूक करू नये. उभय संघांसाठी ही विश्वकप स्पर्धेची पहिली लढत आहे. त्यामुळे उभय संघांवर दडपण राहील. दडपण कमी करण्यासाठी सर्वंच खेळाडू पहिल्या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक असतात.'
(वृत्तसंस्था)
०००००