शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कॉलम

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

पाकची भिस्त आफ्रिदीच्या कामगिरीवरहर्षा भोगले कॉलमआपल्या कामगिरीची छाप सोडणार्‍या प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी पाक क्रिकेट ओळखले जाते. पण सध्याच्या पाकिस्तान संघात मात्र अशा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या संघात ना उमर गुल आहे ना जुनेद खान. त्याचसोबत सईद अजमल आणि मोहम्मद आमिर संघात नाहीत, पण ७ फूट ३ ...


पाकची भिस्त आफ्रिदीच्या कामगिरीवर
हर्षा भोगले कॉलम
आपल्या कामगिरीची छाप सोडणार्‍या प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी पाक क्रिकेट ओळखले जाते. पण सध्याच्या पाकिस्तान संघात मात्र अशा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या संघात ना उमर गुल आहे ना जुनेद खान. त्याचसोबत सईद अजमल आणि मोहम्मद आमिर संघात नाहीत, पण ७ फूट ३ इंच उंची लाभलेला मोहम्मद इरफान प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणण्यास सक्षम आहे. त्याची साथ देण्यासाठी वहाब रियाज आणि अन्य गोलंदाज आहेत. त्यांच्या नावावर एकूण १३४ वन-डे विकेट आहेत. विशेष बाब ही आहे, की एकट्या शाहीद आफ्रिदीच्या नावावर ३९३ वन-डे विकेटची नोंद आहे. या वेळी मला प्रथमच पाकिस्तानची गोलंदाजी कमकुवत भासत आहे. पाकची गोलंदाजी भारतीय गोलंदाजीसारखी भासत आहे.
फलंदाजीची बाजू मात्र याउलट आहे. तीन युवा फलंदाजांव्यतिरिक्त दोन सीनिअर फलंदाजांमुळे पाकची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. यष्टिरक्षक सर्फराज अहमदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीत छाप सोडली आहे. अहमद शहजाद व उमर अकमल यांच्या कामगिरीचा अंदाज वर्तविणे कठीण आहे, पण या खेळाडूंमध्ये एकट्याच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. मिस्बाह-उल-हक पाक संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये सर्वांत वेगवान शतकाची नोंद आहे. ४१ व्या वर्षी मिस्बाह चांगल्या फॉर्मात आहे. याव्यतिरिक्त युनूस खानही चांगला कसोटी फलंदाज असून वन-डेमध्येही त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल.
पाकिस्तानला या स्पर्धेत छाप सोडण्यासाठी पहिल्या लढतीत चमकदार कामगिरी करावी लागेल. पाकिस्तान संघाची भिस्त शाहीद आफ्रिदीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर सामन्याचे चित्र बदलण्याची आफ्रिदीमध्ये क्षमता आहे.
०००००