शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रबोधिनी, पोलीस उपांत्य फेरीत महापौर चषक हॉकी : एसआरपीएफ, इन्कमटॅक्स अंतिम चारांत

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

पुणे : महापौर चषक हॉकी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी, सिटी पोलीस, एसआरपीएफ, इन्कमटॅक्स संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत क्रीडा प्रबोधिनीने पेनल्टी शूट आउटमध्ये अस्पात ॲकॅडमीवर ५-२ने मात केली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरी सुटला. अस्पातच्या सचिन भोसलेने योगेश पाठकच्या पासवर गोल करीत संघाला आघाडीवर नेले. मात्र, ...


पुणे : महापौर चषक हॉकी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी, सिटी पोलीस, एसआरपीएफ, इन्कमटॅक्स संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीत क्रीडा प्रबोधिनीने पेनल्टी शूट आउटमध्ये अस्पात ॲकॅडमीवर ५-२ने मात केली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरी सुटला. अस्पातच्या सचिन भोसलेने योगेश पाठकच्या पासवर गोल करीत संघाला आघाडीवर नेले. मात्र, क्रीडा प्रबोधिनीच्या रशिद मुजावर (८ मि.) व हरीश शिंदगी (११ मि.) यांनी गोल करीत आघाडी २-१ अशी आघाडी घेतली. अल्लाउद्दीन शेखने (३४ मि.) संजय महाब्दीच्या पासवर गोल करीत अस्पातला बरोबरी साधून दिली. शूटआऊटमध्ये क्रीडा प्रबोधिनीने बाजी मारली.
सिटी पोलीस संघाने पुणे मॅजिशियनला १-०ने नमविले. गणेश गिरी गोसावीने (४० मि.) गौरव कांबळेने दिलेल्या पासवर गोल करीत संघाला मिळवून दिलेली १-० आघाडी निर्णायक ठरली. एसआरपीएफने खडकी युनायटेडला ४-१ने सहज नमवीत आगेकूच केली. संदेश मोरे (१३ व २७ मि.), सूरज शाही (३६ व ५२ मि.) यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर एसआरपीएफने खडकी युनायटेडला ४-१ने नमविले. प्रवीण पाटील, राहुल राणे, मिलिंद मलाई व सागर कदम यांनी गोलमध्ये साहाय्य केले. खडकीकडून ऋषभ आव्हाडने (४९ मि.) एकमेव गोल केला.
इन्कमटॅक्स संघाने बीईजीला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ने मात केली. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनी व सिटी पोलीस, इन्कमटॅक्स व एसआरपीएफ संघात लढत होणार आहे.

एस विशाल २ मार्च हॉकी :

क्रीडा प्रबोधिनी (हिरवी जर्सी) व अस्पात संघातील खेळाडूंमध्ये चेंडूचा ताबा मिळविण्यावरून झालेली चुरस.