क्युरिटिबा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की ओढवल्यानंतर ‘ब’ गटात स्पेनने अखेरच्या सामन्यात सोमवारी ऑस्ट्रेलियाचा 3-क् ने पराभव करीत विजयी निरोप घेतला.
स्पेन आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. मध्यंतरार्पयत गोल नोंदविण्यात अपयशी ठरलेल्या स्पेनचा स्टार खेळाडू डेव्हिड व्हिला याने 56 व्या मिनिटाला पहिला गोल केला. काझोर्लाने 68 व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. तिसरा आणि अखेरचा गोल 83 व्या मिनिटाला अलोन्सोने नोंदविला.
2क्1क् मध्ये विजेता ठरलेला स्पेन संघ ब्राझीलमधील विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद होईल, याची कुणी कल्पनाही केली नसेल़ मात्र, या संघावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली आह़े स्पर्धेतील पहिल्या लढतीत हॉलंडने 5-1 ने धूळ चारली होती.
दुस:या सामन्यात चिलीने 3-2 असे पराभूत करीत स्पर्धेतून घरचा रस्ता दाखविला होता़ ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात चिलीकडून आणि त्यानंतर हॉलंडकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे संघाचे बाद फेरीचे स्वप्न धुळीस मिळाले. (वृत्तसंस्था)