शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

स्पेन, अर्जेंटिना विजयी

By admin | Updated: June 9, 2014 04:08 IST

एटलेटिको माद्रिदचा स्ट्रायकर डेव्हिड विलाने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर स्पेनने ब्राझीलमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात एल साल्वाडोरचा २-० ने पराभव केला

वाशिंग्टन : एटलेटिको माद्रिदचा स्ट्रायकर डेव्हिड विलाने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर स्पेनने ब्राझीलमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात एल साल्वाडोरचा २-० ने पराभव केला. विलाने ६० व्या मिनिटाला हेडरद्वारे पहिला गोल नोंदविला तर ८७ व्या मिनिटाला पुन्हा एकदा चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. स्पेनिश संघातर्फे विलाने कारकीर्दीतील ५८ वा गोल नोंदविला. विश्वकप स्पर्धेत स्पेन संघ ‘ब’ गटात असून त्यांना सलामीला नेदरलँडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर त्यांची चिली व आॅस्ट्रेलियाविरुद्ध लढत होणार आहे.अर्जेंटिनाची स्लोव्हेनियावर मातला प्लाटा : कर्णधार लियोनल मेस्सी व रिकार्डो एलवाजरेज यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर विश्वकप सराव सामन्यात अर्जेंटिनाने स्लोव्हेनियाचा २-० ने पराभव केला. अर्जेंटिनाने ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी ब्यूनास आयर्समध्ये ला प्लाटा येथे अखेरचा सराव सामना खेळला. एलवाजरेजने ११ व्या मिनिटाला तर मेस्सीने ७५ व्या मिनिटाला गोल नोंदविला. अमेरिकेचा विजयजॅक्सोनव्हिले : जोजी एलटिडोरने गोलचा दुष्काळ संपविताना अमेरिकेला विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात नायजेरियाविरुद्ध २-१ ने विजय मिळवून दिला. एलटिडोरने २०१४ मध्ये एकही गोल नोंदविलेला नव्हता. पण अखेरच्या सराव सामन्यात त्याने ३२ व ६८ व्या मिनिटाला गोल नोंदवीत अमेरिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशिक्षक जर्गन क्लिन्समॅनच्या संघाने ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी सराव सामन्यांत विजयाची हॅट््ट्रिक नोंदविली. यापूर्वी अमेरिकेने सराव सामन्यात अझरबैजान व तुर्की संघाचा पराभव केला. नायजेरियातर्फे व्हिक्टर मोईजेसने सामना संपायला चार मिनिटांचा अवधी शिल्लक असताना पेनल्टीवर गोल नोंदविला. रोनाल्डोच्या आगमनामुळे पोर्तुगालचे मनोधैर्य उंचावलेन्यू जर्सी : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा स्टार कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो पायाच्या दुखापतीतून सावरला आहे. शनिवारी रोनाल्डो संघात परतल्यामुळे पोर्तुगाल संघाचे मनोधैर्य उंचावले. स्टार फॉरवर्ड रोनाल्डोला गेल्या काही आठवड्यात दुखापतीमुळे सतावले होते. जांघ व गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या रोनाल्डोला गेल्या दोन सराव सामन्यांत सहभागी होता आले नाही. त्यामुळे ब्राझीलच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता होती. पोर्तुगाल संघाची विश्वकप मोहीम १६ जूनपासून प्रारंभ होणार आहे. २९ वर्षीय रोनाल्डा अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये पोर्तुगाल संघाच्या आयोजित सराव शिबिरात सहभागी झाला होता. (वृत्तसंस्था)