शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूचा ‘फुलराणी’ला धक्का

By admin | Updated: April 1, 2017 01:14 IST

इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या

नवी दिल्ली : इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालला सरळ दोन गेममध्ये धक्का दिला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. सिंधूने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य ठेवताना दमदार खेळ करताना सायनाचे तगडे आव्हान २१-१६, २२-२० असे परतावले. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर सायनाने दुसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी सिंधूला झुंजवले. यावेळी सायना बरोबरी साधणार असेच चित्र होते; परंतु दुसरा गेम २०-२० असा बरोबरीत असताना सिंधूने आक्रमक पवित्रा घेत सलग दोन गुण वसूल करीत सामन्यावर कब्जा केला. विशेष म्हणजे, याआधी सायना आणि सिंधू कारकिर्दीत केवळ एकदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी सायनाने सरळ गेममध्ये बाजी मारली होती. यावेळी सिंधूने सरळ गेममध्ये विजय मिळविला. त्याचप्रमाणे, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेतही सिंधूने सायनाला नमविले होते. तसेच, २०१३ सालच्या लीगमध्ये सायनाने सिंधूविरुद्ध बाजी मारली होती. याआधी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील द्वितीय मानांकित कोरियाच्या सुंग जी ह्यून हिने शानदार विजय नोंदविताना गतविजेत्या आणि पाचवी मानांकित रत्चानोक इंतानोनला २१-१६, २२-२० असे नमविले. तसेच, चौथ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीने माजी आॅल इंग्लंड विजेत्या नोजोमी ओकुहाराला २१-१३, ११-२१, २१-१८ असा धक्का दिला. पुरुषांमध्ये दोन वेळच्या उपविजेत्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनने विजयी घोडदौड कायम राखताना चिनी तैपईच्या जू वेई वांगचे आव्हान १९-२१, २१-१४, २१-१६ असे परतावले. (वृत्तसंस्था)