ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. ७ - रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रख्यात असलेला पाकिस्तानचा तेज गोलंदाज शोएब अख्तर (वय ३९) लवकरच बोहल्यावर चढणार असून विशेष म्हणजे अवघ्या १७ वर्षीय तरूणीशी तो लग्न करणार आहे.
पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार रुबाब असे शोएबच्या होणा-या पत्नीचे नाव असून ती एका पाकिस्तानी व्यावसायिकाची मुलगी आहे. रुबाबला क्रिकेटचे फारसे वेड नसून तिला तीन मोठे भाऊ आहेत. १२ जून रोजी शोएब त्याच्या गावी म्हणजेच रावळपिंडी येथे जाणार असून जूनच्या तिस-या आठवड्यात हा पारंपारिक पद्धतीने हा विवाह होणार आहे. गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान शोएबच्या कुटुंबियांची रुबाब हिचे वडील मुश्ताक खान यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर शोएब व रुबाब यांचे लग्न ठरले.
जगातील सर्वात तेज गोलंदाज अशी ओळख असलेला शोएब अख्तर २०११ साली त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.