शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

शिवशंकरचे विजेतेपद

By admin | Updated: February 23, 2015 02:24 IST

कल्याणच्या शिवशंकर संघाने स्पर्धेतील धडाकेबाज खेळ कायम राखताना अशोक मंडळाने (करीरोड) सुवर्ण महोत्सवानिमित्त

मुंबई : कल्याणच्या शिवशंकर संघाने स्पर्धेतील धडाकेबाज खेळ कायम राखताना अशोक मंडळाने (करीरोड) सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शानदार विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात शिवशंकरने बलाढ्य मुंबईच्या विजय नवनाथचे तगडे आव्हान ९-७ असे परतावून लावले.ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिली. पहिल्याच मिनिटाला शिवशंकरने गुणांचे खाते उघडताना जबरदस्त सुरुवात केली. या वेळी सामन्यात आक्रमक खेळ पाहण्यास मिळणार असे वाटत होते. तसेच यानंतर लगेच शिवशंकरच्या बचावपटूंनी नवनाथ संघाच्या आक्रमकाची पकड करून २-० अशी सुरुवात केली. यानंतर मात्र दोन्ही संघांनी कोणताही धोका न पत्करल्याने १० मिनिटांपर्यंत शिवशंकरची हीच आघाडी कायम राहिली. ११व्या मिनिटाला नवनाथच्या अनुभवी सुधीर वलखडेने यशस्वी चढाई केली. मध्यांतराला शिवशंकरकडे २-१ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात तरी आक्रमक खेळ पाहण्यास मिळेल अशी आशा प्रेक्षकांना होती. या वेळी पुन्हा एकदा सुधीरने एकाच चढाईत ३ गडी मारले आणि नवनाथला ४-३ असे आघाडीवर नेले. तर लगेच शिवशंकरच्या नीलेश साळुंखेने अप्रतिमरीत्या बोनस गुणासह सामना ४-४ असा बरोबरीत आणला. यानंतर नवनाथने ६-४ अशी आघाडी घेतली. मात्र शिवशंकरच्या सुरज बनसोडेने आक्रमक चढाई करताना जबरदस्त हनुमान उडी घेत एकाचवेळी ३ बळी घेत संघाचे विजेतेपद निश्चित केले. यामुळे दडपणाखाली आलेल्या नवनाथ संघाकडून चुका झाल्या व त्याचा अचूक फायदा उचलताना शिवशंकरने विजेतेपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)