शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

शर्मा, तेवातियासमोर केकेआर लीनच

By admin | Updated: May 10, 2017 02:08 IST

आयपीएलमध्ये प्ले आॅफसाठी धडपडणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने आज प्ले आॅफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. त्यांचा

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत आयपीएलमध्ये प्ले आॅफसाठी धडपडणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने आज प्ले आॅफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. त्यांचा प्ले आॅफमधील प्रवेश शक्यतांवर अवलंबून असला तरी आजच्या सामन्यात पंजाबने सांघिक कामगिरीच्या जोरावर केकेआरला पराभूत केले. ख्रिस लिनच्या दमदार फटकेबाजीनंतरही पंजाबच्या मोहित शर्मा आणि राहूल तेवातिया यांच्या भेदक माऱ्यासमोर केकेआरला लीन व्हावे लागले. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्ले आॅफमधील प्रवेश निश्चीत मानला जात आहे. मात्र पंजाबदेखील प्लेआॅफसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना आमलाच्या अनुपस्थितीतही पंजाबच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरी दाखवली. स्पर्धेत फारसा दम न दाखवता आलेल्या वृद्धीमान साहा याने मोक्याच्या वेळी उपयुक्त अशा ३८ धावा फटकावल्या. अष्टपैलु आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाला १६७ चा आकडा गाठून दिला. कुल्टर नाईलला वगळण्याचा निर्णय केकेआरला महागात पडला. त्या ऐवजी संधी मइळालेल्या अविनाश राजपूत याला फारशी छाप पाडता आली नाही. तर डी ग्रॅण्ड होम हा केकेआरला चांगलाच महागात पडला. त्याने ३७ धावा मोजल्या. पंजाबने वरुण अ‍ॅरोन आणि टी नटराजन ऐवजी राहूल तेवातिया आणि स्वप्नील सिंग यांनी संधी दिली. हाच निर्णय पंजाबसाठी फायद्याचा ठरला. राहूल तेवातिया आणि मोहित शर्माच्या कामगिरीनेच पंजाबला विजय मिळवून दिला. सुनिल नरेन आणि ख्रिस लीन यांनी अपेक्षेप्रमाणे संघाला सुरूवात करून दिली. लिनने जास्तच आक्रमकता दाखवत फटकेबाजी केली. नरेनला सुरूवातीपासून लय सापडत नव्हती. तो चाचपडत होता. अखेर त्याला मोहितने बाद केले. त्यानंतर आलेल्या गंभीरला आणि लगेचच उथप्पाला राहूल तेवातियाने बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला. त्यातून अखेरपर्यंत केकेआर सावरू शकला नाही. लिन एका बाजुने धावा करत असताना मनिष पांडे मात्र संथ पणे खेळत होता. त्याला मॅट हेन्रीने बाद केले. त्यानंतर केकेआरच्या आशा युसुफ पठाणवर होत्या. विजयासाठी १२ च्या धावगतीने धावा काढणे गरजेचे होते. मात्र फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पठाणलाही हे आव्हान पेलवले नाही. मोहित शर्माने गरजेच्या वेळी त्याला बाद करत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबने या सामन्यात विजय मिळवलेला असला तरी या पुढच्या सामन्यात त्यांच्यासमोर मुंबई आणि पुण्याचे आव्हान असेल. प्ले आॅफच्या शर्यतीसाठी पंजाबला दोन्ही सामने जिंकावे लागतील.