मनाउस : शेरडन शकिरीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर स्वित्ङरलडने होंडुरासचा 3-क् ने पराभव करीत विश्वकप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्ङरलडला अर्जेटिनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
प्रशिक्षक लुइस सुआरेज यांचा संघ या लढतीपूर्वीच बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला होता; पण बुधवारी स्वित्ङरलडविरुद्धच्या लढतीत त्यांनी तुल्यबळ खेळ केला. मिडफिल्डर शकिरीने मध्यंतरानंतर वैयक्तिक तिसरा गोल नोंदवीत स्वित्ङरलडचा अंतिम 16 मध्ये प्रवेश निश्चित केला.
या लढतीपूर्वी ‘ई’
गटात स्वित्ङरलड व इक्वाडोर
संघांचे प्रत्येकी 3 गुण होते. फ्रान्स
6 गुणांसह अव्वल स्थानावर
होता. त्यामुळे स्वित्ङरलड संघाला
बाद फेरी गाठण्यासाठी या
लढतीत विजय मिळविणो आवश्यक होते. स्वित्ङरलडने या
लढतीत सुरुवातीपासून
आक्रमक खेळ केला. स्वित्ङरलड संघाला सुरुवातीलाच खाते उघडण्याची संधी होती. युवा फॉरवर्ड जोसिप जरमिकने चांगली चाल रचत शकिरीला पास दिला.
शकिरीचा जोरकस फटका होंडुरासचा गोलकिपर
नोएल वालादारेसने रोखला. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला शकिरीने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर शकिरीने पुन्हा एकदा मिळालेल्या संधीवर गोलजाळ्याचा वेध घेत संघाला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली.
शकिरी 1954 नंतर विश्वकप स्पर्धेतील सामन्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोल
नोंदविणारा स्वित्ङरलडचा पहिला खेळाडू ठरला. मध्यंतरानंतर 7क् व्या मिनिटाला स्वितङरलडतर्फे डरमिकने शानदार चाल रचत बर्नारडेजला गुंगारा देत शकिरीला पास दिला. (वृत्तसंस्था)
चार वर्षापूर्वी होंडुरासने स्वित्ङरलडला गोलशून्यने बरोबरीत रोखत दुस:या फेरीत स्थान मिळविण्यापासून वंचित ठेवले होते. पण या वेळी मात्र बायर्न मुनिचचा खेळाडू शकिरीने मध्यंतरापूर्वीच दोन गोल नोंदवीत संघाला मजबूत पकड मिळवून दिली.