शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

तोडगा निघेल : ठाकूर

By admin | Updated: March 4, 2016 02:51 IST

धरमशाला येथे भारत-पाक सामन्याच्या आयोजनाबद्दल सुरक्षेचा कुठलाही मुद्दा नाही. विश्वचषक टी-२० चा हा सामना पूर्वनियोजित तारखेला येथेच आयोजित होईल, असा पुनरुच्चार

नवी दिल्ली : धरमशाला येथे भारत-पाक सामन्याच्या आयोजनाबद्दल सुरक्षेचा कुठलाही मुद्दा नाही. विश्वचषक टी-२० चा हा सामना पूर्वनियोजित तारखेला येथेच आयोजित होईल, असा पुनरुच्चार ‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी केला.हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले खा. ठाकूर यांनी सांगितले की, ‘माझी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्यासोबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी मला सामन्याला विरोध दर्शविणाऱ्यांची समजूत काढण्याचे आश्वासन दिले आहे. हा सामना विश्वचषकाचा आहे, द्विपक्षीय मालिकेतील सामना नव्हे हे मी स्पष्ट करू इच्छितो. आम्ही धरमशाला येथे द्विपक्षीय मालिकेतील सामना करू शकत नसू; पण हा विश्वचषकाचा सामना आहे. विश्वचषकाचे वेळापत्रक वर्षभरापूर्वी ठरते. एका रात्रीतून त्यात बदल होणे शक्य नाही. चर्चेद्वारे तोडगा काढण्यावर आमचा विश्वास आहे. कारगील युद्धानंतरही २००५ साली पाकने धरमशाला येथे सामना खेळला होता. विश्वचषकाचा सामना देशाच्या सन्मानाचा सवाल असल्याने आम्ही हा सामना निर्विघ्न पार पाडू इच्छितो.’या सामन्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयने संमती दिल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ‘मुख्यमंत्री विरोध दर्शविणाऱ्यांचे मत परिवर्तन करण्यात यशस्वी होतील अशी आशा आहे. धरमशाला येथे सामना पाहू इच्छिणाऱ्यांनी आधीपासून हॉटेल बुक केले आहेत. तिकिटे बुक केली व अन्य सोयीदेखील बुक केल्या आहेत. ऐनवेळी सामना हलविण्याचा प्रश्नच नाही. मीडियात आलेल्या वृत्तानुसार आम्ही कुठलेही पर्यायी स्थळ शोधलेले नाही.’पठाणकोट हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतोच; शिवाय शहिदांच्या हौतात्म्याचा आम्हालाही सन्मान आहे, असे सांगून ठाकूर म्हणाले, ‘नुकताच आसाममध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ५०० पाकिस्तानी खेळाडू खेळले. त्यावेळी विरोध झाला नाही. हा विश्वचषकाचा सामना आहे. याला विरोध होऊ नये.’ (वृत्तसंस्था)इस्लामाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताकडून पाकिस्तान संघाला सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच आमचा संघ सहभागी होईल, असे पाकचे गृहमंत्री निसार अली खान यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘सुरक्षेची संपूर्ण हमी मिळाल्यानंतरच आम्ही संघाला भारतात जाण्यास परवानगी देऊ. सुरक्षेची हमी ही भारताचीच नव्हे तर आयसीसीची जबाबदारी आहे.’ धर्मशाला येथे १९ मार्चला भारत-पाक सामन्याच्या आयोजनावरून खडाजंगी सुरू असतानाच पाक गृहमंत्र्यांनी वक्तव्य केले. हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरविण्यास नकार दिला आहे. गृहमंत्री खान यांनी पाक संघाच्या भारत दौऱ्याविषयी पीसीबी प्रमुखांशी चर्चेनंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांना मी अहवाल देणार असल्याचे म्हटले आहे.सुरक्षा दलाची गरज नाहीया सामन्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्याची शक्यता ठाकूर यांनी फेटाळून लावली. भारत हा सुरक्षित देश असल्याने येथे सुरक्षेची समस्या नाही. पाकला सुरक्षेची भीती बाळगण्याची गरज नाही. हा राज्य सरकार आणि बीसीसीआयच्या चिंतेचा विषय आहे, असे ते म्हणाले.