शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

मालिका विजयावर डोळा

By admin | Updated: July 6, 2017 01:56 IST

दारुण पराभवानंतर टीकेचे लक्ष्य ठरलेला भारतीय संघ आज पाचव्या आणि अखेरच्या वन डेमध्ये यजमान वेस्ट इंडीजला धूळ चारून मालिका

किंग्स्टन : दारुण पराभवानंतर टीकेचे लक्ष्य ठरलेला भारतीय संघ आज पाचव्या आणि अखेरच्या वन डेमध्ये यजमान वेस्ट इंडीजला धूळ चारून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.चौथ्या सामन्यात १९० धावांचा पाठलाग करणारा भारत भक्कम फलंदाजीच्या बळावर सहज विजय नोंदवेल, असे वाटले होते. तथापि, मंद खेळपट्टीवर संघाला ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सर्वाधिक टीकेचा सामना करावा लागला तो महेंद्रसिंह धोनीला. त्याने ११४ चेंडू खेळून केवळ ५४ धावा केल्या. मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाल्याने ‘फिनिशर’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. रवींद्र जडेजा हादेखील मोक्याच्या क्षणी बाद होताच तळाच्या फलंदाजांच्या नाकर्तेपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मालिकेत रहाणे आणि धवन जोडीनेच धावा केल्या. रहाणेची चार सामन्यांत तीन अर्धशतके आणि एक शतक आहे. फलंदाजांच्या चुकीच्या फटकेबाजीचा खरपूस समाचार घेणारा कर्णधार विराट कोहली मधल्या फळीत काही बदल करेल, असे संकेत आहेत. मागच्या सामन्यात संधी मिळालेला दिनेश कार्तिक अपयशी ठरला, तरी बाहेर बसण्याची शक्यता कमी आहे. युवराजसिंग हा निवडीसाठी उपलब्ध असेल का, हादेखील प्रश्न आहे. केदार जाधवला अनेकदा संधी देण्यात आली; मात्र त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला.मागच्या विजयामुळे विंडीजचे मनोबल उंचावल्याने मालिका बरोबरी करण्याच्या तयारीने यजमान संघ उतरेल. दुसरीकडे, भारतीय संघ पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धारासह खेळणार, हेदेखील निश्चित. (वृत्तसंस्था)उभय संघ असेभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, मोहंमद शमी आणि रवींद्र जडेजा.वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरीष, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एव्हिन लुईस, जेसन मोहंमद, अ‍ॅश्ले नर्स, रोवमॅन पॉवेल आणि केसरिक विल्यम्स.स्थळ : सबीना पार्क, किंग्सटन, जमैकासामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.